Newsworldmarathi pune: प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) येथील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून त्यांच्या कामकाजावर आधारित प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. केवळ आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष काम करून दाखवण्यावर आपण भर दिला असल्याचे त्यांनी प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
नगरसेवक म्हणून आपल्या कार्यकाळात अर्चना पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांनी विशेष काम केले असून प्रभागातील तब्बल ७,००० महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली भरून घेतले. या योजनेमुळे प्रभागातील हजारो महिलांना नियमित आर्थिक आधार मिळाला असून, त्यांच्या कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लागला आहे.
आरोग्य क्षेत्रातही अर्चना पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. केंद्र सरकारच्या ‘आयुष्यमान भारत’ योजने अंतर्गत प्रभागातील ५,००० नागरिकांची नोंदणी करून घेण्यात आली. नोंदणीनंतर लाभार्थ्यांना सन्मानपूर्वक आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे गरजू नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे.
“प्रभागातील प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे,” असे मत सौ. अर्चना तुषार पाटील यांनी व्यक्त केले. त्यांच्या या ठोस, जनहितकारी कामगिरीमुळे प्रभाग २२ ‘क’ मधील मतदारांकडून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत असून आगामी निवडणुकीत त्यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.


Recent Comments