Homeपुणेपुण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत अस्वस्थता; पराभवानंतर मुंबईतील बैठकीत पदाधिकाऱ्यांचा संताप

पुण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत अस्वस्थता; पराभवानंतर मुंबईतील बैठकीत पदाधिकाऱ्यांचा संताप

Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जोरदार धक्के बसले असून पक्षातील अनेक बड्या नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निकालानंतर पुण्यात खरोखर शिवसेना आहे का, ती कधी होती आणि आज नेत्यांनी ती टिकवून ठेवली आहे का, असे प्रश्न पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत आहेत. ही अस्वस्थता नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उघडपणे समोर आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पक्षाच्या कामगिरीवरून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शिंदेसाहेबांनी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती ते नेते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला. विशेषतः एका महिला पदाधिकाऱ्यांनी अत्यंत धारदार शब्दांत काही वरिष्ठ नेत्यांवर टीका केल्याची चर्चा आहे. संबंधित महिला नेत्या केवळ आपला चमू सांभाळण्यातच व्यस्त असून संघटनात्मक बांधणी, प्रचार आणि कार्यकर्त्यांशी संवाद या बाबींमध्ये त्या अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच, काही नेत्यांनी पक्षाकडे वैयक्तिक फायद्यासाठी पाहिले असून शिवसेना म्हणजे स्वतःचे उखळ पांढरे करण्याचे साधन बनवले असल्याची संतप्त भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. या स्पष्ट आणि थेट वक्तव्यांमुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, पक्षाच्या राज्य नेतृत्वाला बैठकीतील काही मुद्दे पटल्याने नेमके कोण काय बोलले आणि त्यानंतर काय निर्णय झाले, हे बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, उघडपणे संताप व्यक्त करणाऱ्या या महिला पदाधिकाऱ्यांच्या निशाण्यावर नेमके कोणते नेते आहेत, हा प्रश्न आता पक्षात चर्चेचा विषय ठरला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments