Homeपुणेनिवडणूक निकालानंतर थेट मैदानात; नगरसेविका रुपाली धाडवे ॲक्शन मोडमध्ये

निवडणूक निकालानंतर थेट मैदानात; नगरसेविका रुपाली धाडवे ॲक्शन मोडमध्ये

Newaworldmarathi Pune : प्रभागातील सुखसागरनगर येथील स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळ असलेल्या लाईट डीपीच्या कंपाउंडची भिंत तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या डीपीबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरण विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र निवडणूक आचारसंहिता आणि निवडणुकीची धावपळ सुरू असल्याने या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता.

दरम्यान, १६ जानेवारी २०२६ रोजी पुणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि प्रभागातून सौ. रुपालीताई धाडवे या विजयी झाल्या. निकाल लागल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर कामाला सुरुवात करण्यात आली. मयुरदादा धोंडे मित्र परिवार यांच्या पुढाकारातून आणि महावितरण विभागाच्या माध्यमातून संबंधित लाईट डीपीला नवीन सुरक्षित कंपाउंड बसवून घेण्यात आले.

या कामामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे. नवीन कंपाउंड बसविण्याच्या कामाची पाहणी करताना मा. नगरसेवक दिनेश (पिंटूभाऊ) धाडवे, मयुरजी धोंडे तसेच परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी नगरसेविका सौ. रुपालीताई धाडवे यांच्या तत्परतेचे आणि सेवाभावी कार्यपद्धतीचे कौतुक केले.

निवडणूक जिंकल्यानंतर केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. रस्त्यावर थांबून, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन प्रश्न सोडवणारी ही कार्यपद्धत खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी कशी असावी, याचा आदर्श ठरत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments