Homeपुणेलोहगाव जमिनीच्या विक्री प्रकरणात साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या सुभाष दुगड, राजेंद्र...

लोहगाव जमिनीच्या विक्री प्रकरणात साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या सुभाष दुगड, राजेंद्र दुगडसह ५ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पुणे : Pune Crime Court News । न्यायालयात दावा चालू असताना लोहगाव येथील जमिनीबाबत कोणतीही पूर्वसंमती न घेता परस्पर विक्री करुन ५ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सुभाष दुगड, राजेंद्र दुगड यांच्यासह ५ जणांची न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Advertisements

याबाबत रवींद्र नौपातलाल साकला (वय ६३, रा. आर एन एस अॅलेक्झांड्रा रोड, घोरपडी) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुभाष उत्तमचंद दुगड Subhash Uttamchand Dugad, राजेंद्र उत्तमचंद दुगड Rajendra Uttamchand Dugad (रा. बिबवेवाडी) संदेश अशोक भन्साळी Sandesh Ashok Bhansali (रा. राज् र ता खेड), शेख उमर लतीफ इनामदार Sheikh Umar Latif Inamdar (रा. चदंननगर), भास्कर रेड्डी नारायण कल्लरी रेड्डी Bhaskar Reddy Narayan Kallari Reddy (रा. बी. कवडे रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार लोहगाव येथील सर्वे नंबर १६३, NEW नंबर ८/१/२ एकूण क्षेत्र १ हेक्टर ८ आर पैकी नार येथे व वेगवेगळ्या शासकीय दुय्यम निबंधक कार्यालयात २०१० ते सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र साकला हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची लोहगाव येथे जमीन आहे. आरोपी सुभाष दुगड, राजेंद्र दुगड व इतरांनी या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांचा न्यायालयात दावा चालू आहे. असे असताना आरोपींनी आपसात कट रचून साकला यांची कोणतीही संमती न घेता जमिनीची परस्पर विक्री केली. त्याचे ५ कोटी ७० लाख रुपये स्वीकारुन फिर्यादी यांचे आर्थिक नुकसान पोहचवुन फसवणूक केली आहे. लोहगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

लोहगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी पाच जणांना न्यायालयात हजर केले होते. आरोपी यांनी तयार केलेले बनावट कुलमुख्यत्यार पत्र, बनावट खरेदी खत हस्तगत करायचे आहे. त्यांनी कोणाकोणाकडून पैसे घेतले, त्याची माहिती घेऊन ते हस्तगत करायचे आहेत.

यातील आरोपी मेहबुब अब्दुल गफार शेख हा फरार असून आरोपीच्या मदतीने त्याचा शोध घ्यायचा आहे. मेहबुब शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी फसवणूकीचे आर्थिक गुन्हे दाखल आहेत. तसेच NEW Iडळ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का प्रति कारवाई करण्यात आली होती. तसेच भास्कर रेड्डी आणि सुभाष दुगड यांच्यावरही यापूर्वी गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडे तपासासाठी पोलीस कोठडी मिळाली, अशी पोलिसांनी विनंती केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला विरोध करत हा सर्व कागदोपत्री पुरावा आहे, त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यांचे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments