Homeपुणेजय जिनेन्द्र गृह रचना संस्थेत अभिनव उपक्रम

जय जिनेन्द्र गृह रचना संस्थेत अभिनव उपक्रम

Newsworld Pune : एका चांगल्या कामाची सुरुवात अनेक चांगल्या कामांची प्रेरणा ठरते अशाच एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात वाकड येथे विजू शेठ जगताप व विराज रेणुसे यांनी उभारलेल्या जय जिनेन्द्र गृह रचना संस्थेमध्ये झाली. जय जिनेन्द्र गृह रचना संस्थेमध्ये आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राची सुरुवात संस्थेने केली.

या संस्थेमध्ये प्रथित यश जैन समाज बांधव एकत्र येऊन आदर्शवत असे काम करत आहेत स्वतः देशी गायींचे संगोपन करून त्याचे दूध सर्व रहिवाशांना देतात इथे राहणारे उच्चशिक्षित जैन बांधव पावसाचे पाणी साठवून ते फक्त पिण्यासाठी वापरतात रोज लागणारे दूध व भाजीपाला स्वतः पिकवतात आणि या पार्श्वभूमीवर त्यांनी नव्याने आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचा शुभारंभ हे सुद्धा त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे चातुर्मासामध्ये विविध धार्मिक उपक्रम येथे चालू असतात व आपली संस्कृती जपण्याचे काम या संस्थेमध्ये पदाधिकारी करत असतात सोसायटीमध्ये मकराना दगडामध्ये भव्य दिव्य मंदिराचे काम सुद्धा सुरू आहे.

सगळ्यांना आदर्शवत वाटणारे काम या सोसायटीत एकोप्याने सुरू आहे अशाच प्रकारचे आदर्श गृह प्रकल्प भविष्यात उभे रहावेत ही काळाची गरज आहे .असे यावेळी डॉ.भाषा प्रभू पंकज महाराज गावडे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. यावेळी माझ्यासह विजय शेठ जगताप, चंदूकाका सराफ चे प्रोप्रायटर अतुल शहा, शितल दोशी, विलासराव भंणगे, नेमीचंद सोळंकी, आयुर्वेदाचार्य मुके सर , डॉ. अभय जमदग्नी, चौगुले काका व सर्व पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments