Homeपुणेपुणे विद्यापीठातील गैरकारभारावर वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेचा हल्लाबोल; ७ दिवसांत उत्तर न...

पुणे विद्यापीठातील गैरकारभारावर वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेचा हल्लाबोल; ७ दिवसांत उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Newsworldmarathi Pune सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध प्रशासकीय त्रुटी, पारदर्शकतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर प्रश्नांवर वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंना निवेदन देत ७ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. अन्यथा विद्यापीठ परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

Advertisements

संघटनेने मेसमधील अन्नाची गुणवत्ता व स्वच्छता, बी.कॉम. अंतिम वर्षाच्या निकालातील कथित त्रुटी, लेखापरीक्षणात चर्चेत आलेल्या ₹३०० ते ₹३५० कोटींच्या व्यवहारांची माहिती, तसेच पावसामुळे उत्तरपत्रिका भिजल्याच्या घटनेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित या सर्व प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Advertisements

याशिवाय, प्रत्येक मुद्द्यावर तथ्याधारित लेखी उत्तर देणे, आवश्यक ठिकाणी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमणे, चौकशी अहवाल सार्वजनिक करणे आणि मेसमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून प्रशासनातील विविध बाबींवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने विद्यापीठाने पारदर्शक भूमिका घ्यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. ७ दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर आणि आवश्यक कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्यास विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेने दिला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments