Homeपुणेकाळेपडळमधील दूषित पाणीप्रश्नी नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल आक्रमक; महापालिका सभागृहात तातडीच्या कारवाईची...

काळेपडळमधील दूषित पाणीप्रश्नी नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल आक्रमक; महापालिका सभागृहात तातडीच्या कारवाईची मागणी

Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील काळेपडळ परिसरात ड्रेनेज लाईनमधील सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याच्या गंभीर समस्येचा मुद्दा नगरसेवक निवृत्ती आण्णा बांदल यांनी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून देण्यात आले.

Advertisements

या संदर्भात नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली. दूषित पाणीपुरवठ्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisements

काळेपडळ परिसरातील नागरिकांकडून सातत्याने दूषित पाण्याबाबत तक्रारी येत असून, ड्रेनेज आणि जलवाहिन्यांमधील बिघाडामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून दोषी यंत्रणा दुरुस्त करावी तसेच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

सभागृहात हा विषय मांडताना नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल यांनी नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे ठामपणे सांगितले. तसेच या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांच्या भावना तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

या प्रकरणाकडे आता महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि काळेपडळ परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न किती लवकर मार्गी लागतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments