Homeपुणेसिंहगड रस्त्यावरील देशपांडे उद्यानात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; बंदोबस्ताची मागणी

सिंहगड रस्त्यावरील देशपांडे उद्यानात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; बंदोबस्ताची मागणी

Newsworldmarathi Pune: सिंहगड रस्त्यावरील पुणे महापालिकेच्या पु. ल. देशपांडे उद्यानात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उद्यानात दररोज लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाचे पदाधिकारी अविनाश खंडारे यांनी केली आहे.

Advertisements

यासंदर्भात खंडारे यांनी पुणे महापालिकेच्या उद्यान अधीक्षकांना २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदन दिले आहे. उद्यानाचा परिसर अत्यंत सुंदर असून, सकाळच्या वेळी व्यायाम, फिरणे आणि विरंगुळ्यासाठी अनेक नागरिक येथे येतात. मात्र, उद्यानात सध्या सुमारे सहा ते सात मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Advertisements

सकाळच्या वेळी एका नागरिकावर या कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटनाही निवेदनात नमूद केली आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक तैनात असले, तरी उद्यानाच्या आतील भागात मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खंडारे यांनी केली आहे.

उद्यानात येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी संबंधित विभागाने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. आता या निवेदनाची दखल घेऊन महापालिका प्रशासन काय पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments