Newsworldmarathi Pune:‘कर्करोगाच्या रूग्णांना मानसिक आधार देणाऱ्या संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला हवी.’- पद्मश्री रमण गंगाखेडकर (वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट आणि डॉ. सी.जी. पंडित नॅशनल चेअर, ICMR). ‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ (RIRF) आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ (TSMH) यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (PIC) येथे ‘सी पॉझिटिव्ह अॅवॉर्ड्स २०२६’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. गंगाखेडकर यांच्याबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि लेखिका श्रीमती. रेणुका शहाणे तसेच लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कॅन्सर (कर्करोग) या शब्दाचे केअर (काळजी), कम्पॅशन (करुणा) आणि करेज (धैर्य) या त्रिसूत्रीत रूपांतर करणाऱ्या पडद्यामागील खऱ्या नायकांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला हा वार्षिक सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.
या सोहळ्यात, रुबी अहलुवालिया व आदित्य पुरोहित या दोघांचा कॅन्सरशी यशस्वी झुंज देत, आपल्या आयुष्यातून इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य करण्यासाठी तर, रिबेका डीसूझा, डॉ. संजय देशमुख, गॅलक्सी केअर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि इंडियन केअर सोसायटी या कॅन्सर क्षेत्रात सेवा देणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. याच बरोबर ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायको-ऑन्कोलॉजी’ (Post Graduate Diploma in Psycho-Oncology)चा ३१ विद्यार्थांचा दीक्षांत समारंभदेखील संपन्न झाला. यात देशातल्या विविध राज्यातून आलेल्या तसेच परदेशातल्या विद्यार्थांचाही समावेश होता. या जागतिक दर्जाच्या CPD-प्रमाणित सायको-ऑंकोलोजी या कोर्सच्या दुसरा पदवीदान समारंभ होता. आतापर्यंत १२५हून अधिक विद्यार्थांनी या कोर्सचा लाभ घेतला आहे.
कार्यकमात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्रीमती रेणुका शहाणे यांनी आपल्या घरात कॅन्सरचा शिरकाव झाल्यांनतरचे अनुभव सांगितले तसेच कर्करोगाची वेळेवर आणि नियमित शाररीक तपासणी करणे किती गरजेची आहे याचीही जाणीव करून दिली. तर, लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांनी कर्करोगाची वाढती संख्या पाहता, रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी सज्ज झालेल्या पदवीधरांचे कौतुक केले. तिन्ही मान्यवरांनी, कर्करोग आणि रजोनिवृत्ती या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ या संस्थेचे विशेष कौतुक केले.
याच कार्क्रमात, काही घोषणाही करण्यात आल्या. त्यातली एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेनोपॉज मॅनेजमेंट’ (Post Graduate Diploma in Menopause Management) या कोर्सची घोषणा. हा कोर्स रजोनिवृत्तीतून जाणाऱ्या अथवा त्या टप्प्यावर असलेल्या महिलांना सक्षमपणे आयुष्यातील ह्या टप्प्यातील आरोग्य समस्यांना सामोरे कसे जावे यासाठी मार्गदर्शन करणारा आरोग्य क्षेत्रातील तज्ञांसाठी तयार करण्यात आलेला आहे. दुसरी घोषणा ही, रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉजच्या) टप्प्यातून जात असलेल्या आणि त्याबद्दल माहिती मिळवून, आपला हा प्रवास सुखकर करण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी ‘सेल्फ-पेस्ड मेनोपॉज कोर्स’ (स्वतःच्या गतीने शिकता येणारा कोर्स)च्या शुभारंभाची होती.
‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ संस्थांचे संस्थापक डॉ.गिरीश लाड यांनीही आपले विचार मांडले. ‘स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी सुरू झालेला उप्रकम आता विस्तारला आहे. कर्करोग रुग्णांच्या आणि महिलांच्या मानसिक आरोग्यासाठीचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमच्या कोर्सची किंवा संस्थेशी माहिती हवी असल्यास texasschoolmh.com ही आमची वेबसाईट बघू शकता. किंवा आमच्याबरोबर जोडण्याची इच्छा असल्यास संस्थेशी 9545300800 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा असंही ते म्हणाले.


Recent Comments