Newsworldmarathi Pune: बिगर बासमती तांदळाच्या मागणीमुळे जागतिक बाजारपेठेत भारताचे वर्चस्व कायम,यावर्षी म्हणजे जानेवारी 2026 ते जून 2026 या सहा महिन्यांमध्ये तांदळाच्या निर्यातीमध्ये भारतातून 5% ची वाढ झाली आहे.गेल्या वर्षी आपण भारतातून 11.68 दशलक्ष टन निर्यात झाली होती आणि यावर्षी तांदळाची निर्यात 12.27 दशलक्ष टन झाली आहे.भौगोलिक,राजकीय तणाव,अमेरिका इराण युद्ध असताना सुद्धा भारताने निर्यातीमध्ये आपली परंपरा कायम ठेवली आहे.5% टक्केची चांगली अशी वाढ दर्शवली आहे.
त्यामध्ये मूळ कारण अशी आहेत की आपल्याला तांदळामध्ये निर्यातीमध्ये स्पर्धेमध्ये आपल्याबरोबर जे कोणी देश आहेत त्यामध्ये मुख्यतः थायलंड,व्हिएतनाम आणि पाकिस्तान आहेत या तिन्ही देशांनी जेवढी निर्यात केली आहे तेवढी निर्यात भारताकडून झाली आहे.साधारणत जगातील जी निर्यात होते त्यातली 40% निर्यात हा फक्त भारत एकमेव देश करतो.ही नोंदणीय गोष्ट आहे याची दोन-तीन कारणे आहेत की गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तांदळाचा चांगला उत्पादन आलं.देशातल्या मागणी पेक्षाही अधिक उत्पादन आल्यामुळे आपण निर्यात करू शकलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थायलंड,व्हिएतनाम आणि पाकिस्तान पेक्षाही आपल्या तांदळाचे दर जागतिक स्तरावर कमी आहेत.
त्यामुळे आपल्याकडून जानेवारी 2026 ते जून 2026 मध्ये खूप चांगली अशी निर्यात झाली आहे या निर्यातीमध्ये साधारणतः आपल्याकडून बासमती तांदळाची निर्यात यावेळी 5% टक्क्यांनी गेल्या वर्षी पेक्षा कमी झाली आहे.आपल्याकडे या सहा महिन्यांमध्ये बासमतीची निर्यात ही 3.7 दशलक्ष टन झाली आहे याचे एकच कारण आहे की युद्ध चालू होते आणि आपल्याकडे बासमती जो आहे हा सौदी अरब,इराण अशा बऱ्याच देशांमध्ये जातो तर त्या देशांमध्ये युद्ध असल्यामुळे बासमतीची मागणी कमी होती आणि त्यामुळे बासमतीची निर्यात कमी झाली.परंतु असा असतानाही सुद्धा नॉन बासमतीने निर्यातीमध्ये खूप मोठी वाढ केली आहे.नॉन बासमतीची निर्यात या वेळेला साधारण 9% टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ही जी वाढ झाली आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडून नॉन बासमती तांदूळ बांगलादेश, आफ्रिका,कॅमेरॉन,श्रीलंका अशा देशांमध्ये निर्यात झाला आहे.
एकंदरीत सहा महिन्याची जी निर्यात आहे जी 5% टक्क्यांनी वाढ झाली आहे ती खूप चांगली गोष्ट आहे.पुढील काळात ही निर्यात टिकून राहिला पाहिजे किंवा वाढायला पाहिजे,कारण की ही निर्यात झाली तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अब्जो रुपयात परकीय चलन मिळेल.
जुलै महिन्या पासून निर्यातीमध्ये बराच मोठ्या फरक पडला आहे.जुलै 2026 पासून काही निर्यातीमध्ये जे काही अडचणी आल्या आहेत त्यामध्ये मुख्यतःमालवाहतुकीचे दर खूप वाढलेले आहेत आणि जागतिक पातळीवर त्याची आपल्याशी खूप मोठी स्पर्धा होत आहे.आपल्या लॉजिस्टिक मध्ये ज्या अडचणी आहेत जे निर्यातदार आहेत त्यांना खूप मोठा दरवाढीचा सामना करावा लागत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्गो कंटेनर उपलब्ध होत नाहीयेत.या दोन गोष्टीची खूप मोठी अडचण आहे,त्यामुळे कार्गो नसल्यामुळे त्यांनी दर वाढवले आहेत.
तांदूळ वाहतुकीच्या दरामध्ये खूप वाढ झाली,साधारणता काही महिन्या पूर्वी एक शिपमेंट पाठवण्यासाठी 1500 ते 2000 डॉलर इतका खर्च येत होता.तो आता 7000 ते 7500 डॉलर इतका येत आहे आणि तो परदेशी व्यापाऱ्यांना परवडत नसल्यामुळे ते ऑर्डर देत नाहीत. तांदळाच्या निर्यातीचा जो खूप मोठा खर्च आहे,त्यामुळे निर्यातदर खूप मोठ्या संकटात सापडला आहे आणि पुढील काही महिने अशी परिस्थिती राहिली तर निर्यातीच लक्ष्य गाठणे खूप अवघड होईल.या परिस्थितीमध्ये सरकारला अशी विनंती आहे की, आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकायचा असेल तर निर्यात चालू ठेवायचे असेल आणि देशातील तांदळाचे जे अतिरिक्त उत्पादन आहे ते वाया न जाता ते परदेशात निर्यात व्हायला पाहिजे.त्यासाठी जे आता निर्यातीदाराला जे मुख्य अडचण आहेत की वाहतुकीसाठी कार्गो मिळत नाही किंवा उपलब्ध नाहीत, उपलब्ध आहेत तर त्याचे दर तिप्पट झालेले आहेत.त्याच्यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यायला पाहिजे.निर्यातदाराला कार्गो उपलब्ध करून द्यायला पाहिजेत.
यासाठी शासनाने खूप गांभीर्याने त्याच्यावर काम करायला पाहिजे नाहीतर निर्यातीचा खूप मोठा विपरीत परिणाम होईल आणि देशाला जे परकीय चलन मिळते त्याच्यावर खूप मोठा फरक पडेल आणि आणि बराच रोजगार याच्यावर टिकून आहे.हा रोजगार पण कमी होऊ शकतो.अशा परिस्थितीमध्ये पुढील काळात निर्यात वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी,थायलंड पाकिस्तान आणि व्हिएतनाम सोबत स्पर्धा करायचे असेल तर नॉन बासमती आणि बासमती कार्गोचे दर त्वरित कमी करायला पाहिजे आणि कार्गो उपलब्ध करून द्यायला पाहिजेत,अशी माहिती जयराज ग्रुपचे (निर्यातदार) धवल शाह यांनी दिली.


Recent Comments