Newsworldmaratgi Pune : केशवनगर-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उड्डाणपुलाचे रविवारी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला.
दरम्यान, या उड्डाणपुलाला दिवंगत अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना निवेदन दिले आहे.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजितदादा पवार यांनी पायाभूत सुविधा आणि वाहतूक प्रकल्पांना प्राधान्य दिले. त्यांच्या विकासाभिमुख कार्याची आठवण कायम राहावी, या उद्देशाने उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या उड्डाणपुलाची लांबी सुमारे ४११ मीटर असून रुंदी २४ मीटर आहे. पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू राहणार आहे.
अजितदादांच्या पुणे शहराच्या विकासातील योगदानाचा सन्मान म्हणून उड्डाणपुलाचे ‘दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल’असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.


Recent Comments