Homeपुणेतांदळाच्या साठ्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक; फूड स्टॉक पोर्टलवर सात दिवसांत नोंदणी...

तांदळाच्या साठ्याची माहिती जाहीर करणे बंधनकारक; फूड स्टॉक पोर्टलवर सात दिवसांत नोंदणी करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

Newsworldmarathi Pune : देशातील तांदळाच्या उपलब्ध साठ्याची सद्यस्थिती स्पष्ट होण्यासाठी आणि अन्नधान्याच्या साठ्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने तांदळाच्या साठ्याची माहिती जाहीर करण्याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

Advertisements

या निर्देशानुसार तांदळाचा साठा करणारे व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, प्रक्रिया करणारे उद्योग तसेच संबंधित साठाधारकांनी आपल्याकडील तांदळाच्या साठ्याची माहिती निर्धारित पद्धतीने जाहीर करणे आवश्यक आहे.

या निर्देशानुसार, संबंधित कायदेशीर घटकांना (Legal Entities) त्यांच्याकडील तांदळाच्या साठ्याची माहिती केंद्र सरकारच्या ‘फूड स्टॉक पोर्टल’वर (Food Stock Portal) नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तांदळाच्या साठ्याची माहिती खालील सहा श्रेणींमध्ये स्वतंत्रपणे जाहीर करावी लागणार आहे.
१. बासमती तांदूळ (Basmati Rice)
२. नॉन-बासमती – प्रीमियम तांदूळ (Non-Basmati – Premium Rice)
३. नॉन-बासमती – सामान्य वाण (Non-Basmati – Common Varieties)
४. अर्ध-उकडलेला तांदूळ (Parboiled Rice)
५. तुटलेला तांदूळ (Broken Rice)
६. धान (Paddy)

सदर आदेश जारी झाल्याच्या तारखेपासून सात दिवसांच्या आत संबंधित सर्व कायदेशीर घटकांनी वरील नमूद श्रेणींनुसार त्यांच्याकडील तांदळाच्या साठ्याचा तपशील फूड स्टॉक पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे. तसेच, त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी या साठ्याच्या तपशिलामध्ये नियमितपणे अद्ययावत माहिती (Updates) भरणे बंधनकारक राहणार आहे.

या निर्णयामुळे देशातील तांदळाच्या उपलब्ध साठ्याची अचूक माहिती शासनाला उपलब्ध होण्यास मदत होणार असून, तांदळाच्या बाजारपेठेतील साठ्याचे प्रभावी निरीक्षण, पारदर्शकता आणि अन्नधान्याच्या पुरवठ्याचे योग्य नियोजन करणे अधिक सुलभ होणार आहे.

त्यामुळे सर्व संबंधित व्यापारी, तांदूळ मिलर्स, घाऊक विक्रेते आणि साठवणूकदारांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करून निर्धारित मुदतीत साठ्याची माहिती पोर्टलवर नोंदवावी आणि दर शुक्रवारी नियमितपणे अद्ययावत करावी, असे आवाहन जयराज ग्रुपचे संचालक डॉ राजेश शहा यांनी केले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments