सोनियाजी व राहुलजींवरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने, कारवायांनी काँग्रेस डगमगणार नाही: रमेश चेन्नीथला
Newsworldmarathi Mumbai: भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
नागपूर शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. आजच्या पदयात्रेत दिक्षाभूमी, ताजुद्दीन बाबा व टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले. या मोर्चात प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनिल केदार, अनिस अहमद, खासदार प्रतिभा धानोरकर, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आ विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलाश कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, जाती धर्माच्या नावावर सुरु असलेला भेदभाव थाबंवण्यासाठी काँग्रेसने सद्भावना यात्रा काढली असून अशा सद्भावना यात्रा राज्यभर काढल्या पाहिजेत. भाजपा जाती धर्माच्या नावाखाली भेदभाव करत आहे. नागपुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना या शहरात हिंसाचार झाला त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नागपूरचे आहेत तरीही त्यांना या घटनेची माहिती कशी मिळाली नाही? गुप्तचर विभागाने त्यांना माहिती दिली होती का? याचे उत्तर द्यावे लागेल आणि दंगलीची चाहुलच लागली नसेल तर हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे. महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री यांनी या दंगलीची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन दोषींना शिक्षा केली पाहिजे असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते पण पोलीस फोन उचलत नव्हते असे भाजपा आमदार सांगत होते, यातून दंगलीचे प्रायोजक कोण होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे.
उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत. आपल्याला एकजुटतेने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे. संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. सत्तेसाठी काही लोक भावाभावात, जातीपातीत भांडणे लावत आहेत. सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्यांनी जाती धर्मात, भावा भावात भांडणे लावू नये, असे आवाहन सपकाळ यांनी केले.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पुरोगामी विचाराने चालवणाऱ्या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले. संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जाती धर्माच्या नावाने वाद निर्माण करत आहेत. एक मंत्री मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतो पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत. नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले त्याप्रकरणी अधिकाऱ्यांना आता माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारचा नपुंसक सरकार असा उल्लेख केला हे लाजीरवाणे आहे असे वडेट्टीवार म्हणाले. माजी मंत्री नितीन राऊत, सुनिल केदार, माणिकराव ठाकरे, अनिस अहमद यांनीही यावेळी भाषणे केली.
Nanded Crime: पत्नीला मूल होत नाही म्हणून मारहाण; तहसीलदाराने पिस्तूल रोखल्याचा प्रकार, जादूटोण्याचाही आरोप
Newsworldmarathi Nanded: नांदेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून पत्नीवर पिस्तूल रोखण्याचा आणि जादूटोण्याचा प्रयत्न तहसीलदाराने केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तहसीलदाराचे नाव अविनाश शेंबटवाड असून, नांदेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश शेंबटवाड हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांचे सासर मगनपुरा परिसरात आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत असे म्हटले आहे की, पत्नीला मूल होत नाही म्हणून शेंबटवाड यांनी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला, शिवाय तिच्यावर जादूटोण्याचा प्रयोग करण्याचाही प्रयत्न केला.
पत्नीवर पिस्तूल रोखणं, शारीरिक-मानसिक छळ करणं आणि मूलबाळ होण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न करणं, अशा गंभीर आरोपांखाली नांदेडचे तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर 11 मार्च रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 एप्रिल रोजी त्यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
फिर्यादीतील गंभीर आरोप:
– लग्नाच्या दीड वर्षांतच छळ: फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, अविनाश यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह लावण्यात आला होता. लग्नानंतरच त्यांच्यासह कुटुंबीयांनी छळ सुरू केला.
– कर्तव्यावर असताना मारहाण: पतीसोबत कर्तव्यस्थळी असताना वेळोवेळी कारण काढून मारहाण केली जायची.
– पिस्तूल रोखल्याचा आरोप: जीवे मारण्याच्या उद्देशाने पतीने पिस्तूल रोखल्याचा धक्कादायक आरोप पत्नीने केला आहे.
– जादूटोणा आणि अघोरी उपचार: मूलबाळ होण्यासाठी जादूटोण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
कोणाविरुद्ध गुन्हा?
या प्रकरणात केवळ तहसीलदारच नव्हे तर त्यांचे आई-वडील आणि डॉक्टर असलेले दोन भाऊ यांच्याविरुद्धही कौटुंबिक छळ तसेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी तहसीलदार पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकारामुळे महसूल विभागात आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस तपास सुरू आहे आणि या प्रकरणातील प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधातील गंभीर आरोपांमुळे संपूर्ण यंत्रणेत खळबळ माजली आहे.
महाआरोग्य शिबिराचा दोन हजार नागरिकांनी घेतला लाभ
Newsworldmarathi Pune: कै. सुनिल भंडारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्था, पुणे आणि रेड स्वस्तिक सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या एकदिवसीय मोफत महाआरोग्य व रोगनिदान महाशिबिराचा दोन हजारापेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात तपासणी केलेल्या 85 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून ब्रेस्ट कॅन्सर निदान झालेल्या महिलांवरही मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
शिवाजी नगर मेट्रो स्टेशन समोरील मोकळ्या जागेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 165 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. रक्तदान करणाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. डोळ्यांची तपासणी करून 700 गरजूंना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. 215 रुग्णांची हृदय तपासणी करण्यात आली असून यातील 40 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
मणका (स्पाईन), मेंदू, कॅन्सर, स्त्रीरोग आणि अर्धांगवायू या सारख्या आजारांवरही तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मोफत सल्ला व प्राथमिक उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबिरात डॉ. संजय तरलेकर, डॉ. स्मिता वाबळे, डॉ. गुरुतेजसिंग ब्रार (कॅनडा), आणि डॉ. सुनील साबळे यांनी रुग्णांची तपासणी केली.
सीआयडीचे डीआयजी सारंग आव्हाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त सुनील चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक सनी निम्हण, बाळासाहेब बोडके, उदय महाले, प्राचार्य वाल्हेर, प्रसाद भिमाले, तिरुपती भंडारी आदींनी शिबिरास भेट देऊन समाजभिमुख कार्याचे कौतुक केले.
या आरोग्य शिबिरामुळे शेकडो गरजू नागरिकांना मोफत औषध वाटप करून आरोग्यविषयक सेवा देण्यात आल्या. या उपक्रमाचे आयोजन सामाजिक बांधिलकीतून करण्यात आल्याचे चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मारुती भंडारी, रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्य सचिव अशोक शिंदे यांनी सांगितले.
“मी पोलिसांच्या हाती लागणार नाही” म्हणणारा, रणजीत कासले अखेर येणार शरण..
Newsworldmarathi Mumbai: “मी पोलिसांच्या हाती लागणार नाही” म्हणणारा, अखेर शरण येणार! निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासलेने खळबळजनक दावा केला आहे.
20 वर्षे सायबर पोलिस दलात काम केलेल्या, आणि सध्या निलंबित असलेल्या रणजीत कासलेने पोलिसांपासून लपून राहण्याचा दावा करत, दररोज दोन गाड्या बदलून लोकेशन बदलत असल्याचं सांगितलं होतं. “पोलिसांनी कितीही प्रयत्न केले, तरी मी त्यांच्या हाती लागणार नाही,” असा टोकाचा इशारा देणाऱ्या कासलेने आता शरण येण्याची तयारी दाखवली आहे.
कासलेने यापूर्वी बीड पोलीस आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्याला ‘वाल्मिक कराडसारखं एन्काऊंटर’ करण्याची ऑफर मिळाल्याचा दावाही केला होता. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. बीड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता, पण तो अचानक गायब झाला होता.
आता कासलेने स्वतःहून शरण येण्याची घोषणा करत, पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या आरोपांची आणि शरणागतीची दखल घेतली जात असून, पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
रणजीत कासलेचा नवा व्हिडीओ: “पळून उपयोग नाही… आता लढणारच!”
बीड पोलिसांकडून शोध घेत असलेला आणि सायबर विभागातील निलंबित अधिकारी रणजीत कासले याने शेअर केलेल्या नव्या व्हिडीओने खळबळ उडवली आहे. “मी कालपासून अनेकांच्या प्रतिक्रिया वाचल्या, काहींशी संवादही साधला. वकिलांशी आणि काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मला जाणवलं – आता पळून काही होणार नाही. मी आतापर्यंत प्रत्येक संकटाचा सामना केला आहे, आणि याही वेळेस करणार आहे,” असं कासले म्हणतो.
व्हिडीओमध्ये कासलेने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की तो बीड पोलिसांसमोर शरण जाणार आहे. “सिस्टीमच्या विरोधात जास्त काळ लढता येत नाही. माझा बळी जाणार हे आता मला स्पष्ट झालं आहे. पण मी जे आरोप केले, ते सिद्ध करून दाखवेन,” असं ठाम वक्तव्य त्याने केलं.
प्रमुख मुद्दे:
– “मी पोलीस खात्याचं मीठ खाल्लं आहे, माझी लढाई आता कायदेशीर मार्गाने लढेन.”
– “मी लवकरच दोन्ही मोबाईल सुरु करणार आहे. कॉल नको – मेसेज करा, मी वाचतो आणि रिप्लाय देतो.”
– “ज्यांच्यावर आरोप केले, ते आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. वॉशिंग मशीनमधून स्वच्छ बाहेर येणार आहेत.”
– “बीड पोलिसांनी मला पकडलं तरी हरकत नाही. मी पोलिसांसमोर हजर होणारच.”
या व्हिडीओनंतर रणजीत कासले पोलिसांच्या ताब्यात आल्यावर त्याच्या चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. पुढील काही तास या प्रकरणात निर्णायक ठरणार आहेत.
कासलेचे गंभीर आरोप:
10, 20, 50 कोटींच्या ऑफर देऊन एन्काऊंटरसाठी दबाव
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत घेतले जातात निर्णय
विश्वासू टीम तयार करून ‘बोगस एन्काऊंटर’ घडवले जातात
चौकशी झाली तरी “आमचं सरकार आहे” असं म्हणत पोलीस अधिकाऱ्यांना आश्वासन
रणजीत कासले सध्या पोलीसांच्या ताब्यात नाही, मात्र त्याने स्पष्ट केले आहे की, “लवकरच दोन्ही मोबाईल सुरु करेन, कॉल करू नका, मेसेज करा. मी प्रतिसाद देईन.” या प्रकरणात आता पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी अभिनेता हर्षद अतकरी
Newsworldmarathi Pune : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या अराध्या फाउंडेशनला आनंद आहे की प्रसिद्ध अभिनेता हर्षद अतकरी, आमच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामील झाले आहेत. हर्षद अतकरी हे “दुर्वा”, “फुलाला सुगंध मातीचा” सारे तुझ्यासोबत, कुण्या राजाचि तू ग राणी या सारख्या लोकप्रिय मराठी मालिकांमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात, त्यांनी आमच्या फाउंडेशनसाठी सामाजिक कारणांप्रती त्यांचे आवड आणि वचनबद्धता आणली आहे. अशा शब्दांत अराध्या फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश येलदी यांनी या नवीन भागीदारीबद्दल आपला उत्साह व्यक्त केला:
अभिनेता हर्षद अतकरी यांचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अराध्या फाऊंडेशन मध्ये सहभाग याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत येलदी बोलत होते.यावेळी अभिनेता हर्षद अतकरी,पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार,अभिनेत्री पूजा वाघ,प्रियांका मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना येलदी म्हणाले, “आम्हाला हर्षद अतकरी यांना अराध्या फाउंडेशनचे चेहरा म्हणून मिळाल्याचा सन्मान आहे. त्यांच्या कलेप्रतीची निष्ठा आणि सामाजिक समस्यांप्रतीची खरी काळजी आमच्या मिशनशी पूर्णपणे जुळते, ज्यामध्ये आम्ही अल्पवजन आणि अकाली जन्मलेल्या मुलांच्या विकासासाठी आवश्यक पोषण आणि वैद्यकीय काळजी प्रदान करतो.”
हर्षद अतकरी यांनी या सहकार्याबद्दल आपले विचार करताना सांगितले की, “अराध्या फाउंडेशनशी संबंधित असणे हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. अकाली जन्मलेल्या आणि अल्पवजन मुलांना समर्थन देण्याचे त्यांचे कार्य खरोखर प्रशंसनीय आहे. या मुलांना योग्य पोषण आणि वैद्यकीय काळजी मिळणे त्यांच्या निरोगी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या उपक्रमांना समर्थन देण्यासाठी आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी मी उत्सुक आहे.”
अराध्या फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रमांच्या आघाडीवर आहे, ज्यामध्ये अकाली जन्मलेल्या आणि अल्पवजन मुलांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. फाउंडेशन आवश्यक वैद्यकीय सुविधा, पोषण समर्थन आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत प्रदान करते. आम्हाला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाशी विशेष स्तनपान वाढवण्यासाठी आणि कांगारू मदर केअर (केएमसी) प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी सहकार्य करण्याचा अभिमान आहे. याशिवाय, सोलापूर महानगरपालिका आणि एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) सोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आम्हाला पूरक पोषण, आरोग्यसेवा आणि पूर्व-शालेय शिक्षण यासह सेवा पॅकेज प्रदान करता येते.
Pune Police ; जिथे कोयत्याची दहशत माजवली; तिथेच पुणे पोलिसांनी गुंडांची मस्ती उतरवली…
Newsworldmarathi Pune : पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी धिंड काढून चांगलीच अक्कल शिकवली आहे.सिंहगड कॉलेजसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ज्या ठिकाणी कोयते नाचवले त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची लाज काढली. आरोपींचा माज उतरवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुन्हा धिंड पॅटर्न सुरू झाला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर आणत आरोपींचा उतरवला आहे.
काही दिवसापूर्वी ही घडली होती घटना
काही दिवसांपूर्वी आरोपींकडून सिंहगड कॉलेज परिसर आणि इतर परिसरात कोणत्या हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.आरोपींनी काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली होती. या सर्व आरोपींना अटक करत पोलिसांनी काढली धिंड
व्यावसायिक लक्ष्मण शिंदे हत्या प्रकरण: वडिलांचा शेवटचा संदेश आणि हत्येचं उलगडलेलं गूढ
पुण्यातील कोथरूड परिसरातील या व्यावसायिकाचा पाटणा (बिहार) येथे खून झाल्याच्या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, व्यवसायाच्या संदर्भात बोलावून घेऊन अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा खून झाला.
लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५ रा. डी पी रोड कोथरुड) असे हत्या झालेल्या व्यावसायिकाचा नाव आहे. त्यांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी कोथरूड पोलिसांत धाव घेत त्यांची मिसिंगची तक्रार दाखल केली होती. कोथरुड पोलिसांचे पथक बिहार राज्यातील पाटण्यात तपासासाठी पोहचल्यानंतर त्यांचा खून झाल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शिंदे हे व्यावसायिक होते. खेड शिवापूर येथे त्यांची सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंगचा व्यावसाय आहे. या व्यावसायाच्या निमित्ताने त्यांचा बिहारमधील काही व्यक्तींशी संपर्क झाला होता. त्या सबंधित व्यक्तीने शिंदे यांना पाटण्यात काम मिळण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले.
शिवराज सागी असे फोन व ईमेलद्वारे बोलणे झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ११ एप्रिल रोजी लक्ष्मण शिंदे पुण्यावरून विमानाने पाटणा येथे गेले होते. त्यानंतर त्यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही एक टोळी असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. या टोळीची गुन्हा करण्याची पद्धत मोठ्या व्यावासायिकांना बहाणा करून बोलावणे, तिथे आल्यानंतर त्यांना लुटणे तसेच त्यांच्याकडील रक्कम काढून खून करणे असे सांगितले जात आहे.
मुलीला आलेल्या मेसेजमध्ये काय??
लक्ष्मण शिंदे हे पाटण्यात पोहचल्यानंतर त्यांचा मुलीशी रात्री साडेआठच्या सुमारास संवाद झाला होता. त्यांनी मोबाईलवरून मी आता झारखंड येथील कोळसा खाणीत मशिन व टूल पाहण्यास जात आहे, असा मेसेज शिंदे यांच्या मुलीला आला होता. ही खान १२०० फूट जमिनी खाली असल्याचे या मेसजमध्ये म्हटले होते.
त्यानंतर शिंदे यांच्या मुलीने आणि कुटुंबीयांनी कोथरुड पोलीस ठाणे गाठत याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक लक्ष्मण शिंदे खून प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही एक टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
विठ्ठलाची वारी जाणार लंडनला…
Newsworldmarathi Pune : पंढरीची वारी आता थेट साता समुद्रापार जाणार आहे. मूळचे अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असलेले विठ्ठलभक्त अनिल खेडकर आणि त्यांची दिंडी पंढरपूर येथून थेट लंडनला श्री विठ्ठलाच्या पादुका घेऊन जात आहेत. १४ एप्रिल ते २१ जून या कालावधीत तब्बल २२ देश आणि अठरा हजार किलोमीटरचा प्रवास या अनोख्या दिंडीतून करणार आहेत. या विठ्ठलाच्या पादुकेचे पूजन विठ्ठल मंदिरात करण्यात आले असून, या अनोख्या दिंडीने लंडनकडे प्रस्थान केले आहे.
पंढरी वारीची ख्याती जगभरात पसरली आहे. अनेक अभ्यासक भक्तमंडळी या वारीचा अनुभव घेताना दिसून येतात. मूळ अहिल्यानगरचे पण सध्या लंडन स्थायिक असणाऱ्या खेडकर या भाविकाने विठ्ठलाच्या पादुकांच्या दिंडीचे आयोजन केले आहे. अनिल एकनाथ खेडकर हे भारतात होते. त्यावेळेस त्यांनी आळंदी ते पंढरपूर अशी वारीदेखील केलेली आहे. त्यावरून लंडन येथे विठ्ठल मंदिर उभे करावे आणि त्या पादुका वारकरी संप्रदायाप्रमाणे दिंडीच्या माध्यमातून आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याचे खेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले.
पंढरपूर येथून लंडन असा प्रवास करताना विविध देश, त्यांच्या विविध परवानगी, पास इत्यादी कायदेशीर मान्यता सहा महिन्यांपासून सुरू होती. यासाठी २२ देशांच्या चारचाकी गाडी प्रवासाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. पुढे त्यांनी १४ एप्रिल ते २१ जून हा कालावधी निश्चित केला. रोज किती किलोमीटर प्रवास, मुक्काम यांचे नियोजन केले.
तनिषा भिसेंच्या बाळांवर उपचार करणाऱ्या सूर्या हॉस्पिटलचा स्वीय सहायकांतर्फे सन्मान
Newsworldmarathi Pune : तनिषा उर्फ ईश्वरी सुशांत भिसे यांचा बाळंतपणादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जुळ्या बाळांवर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्यासह माणुसकीचा हात दिलेल्या वाकड येथील सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा महाराष्ट्र विधानमंडळातील स्वीय सहाय्यक परिवाराच्या वतीने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
गर्भवती तनिषा भिसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्या दोन जुळ्या बालिकांसाठी सूर्या हॉस्पिटलने केवळ वैद्यकीय उपचारच नाही, तर माणुसकीचा हात दिला. त्यांचे संगोपन, काळजी आणि भिसे कुटुंबाला दिलेला मानसिक आधार यातून सूर्या हॉस्पिटल व तेथील स्टाफने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.
या कृतज्ञतेच्या भावनेतून महाराष्ट्र विधानमंडळातील स्वीय सहाय्यक परिवाराच्या वतीने सूर्या हॉस्पिटलला विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ. सचिन शहा आणि डॉ. दिनकर पासलकर यांनी हॉस्पिटलच्या वतीने, तर स्वीय सहाय्यकांच्या वतीने बाळा शुक्ला, आनंद ठोकळ आणि अजित गरुड यांनी आपल्या भावना निवेदनांमधून मांडल्या. राष्ट्रीय कला अकादमी (न्यास), पुणे यांनी रांगोळीच्या माध्यमातून सद्भावना व्यक्त केली.
स्वीय सहायकांच्या वतीने बाळा शुक्ला, एकनाथ बाजारे, मयुर तातुसकर, हर्षद धर्माधिकारी, आनंद ठोकळ, अजित गरुड, शहाजी पवार, किशोर जुमडे, रवींद्र कडू आणि संतोष ढोरे आणि सचिन भामे हे उपस्थित होते.
शुभान सनराजरस ऑक्सफर्ड गोल्फ चषक 2025 चा विजेता
Newsworldmarathi Pune : पुण्यात सुरू असलेल्या गोल्फच्या राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे अंतिम सामने आज पार पाडले.एकूण बारा संघ आणि तीनशे खेळाडू या लीग मध्ये सहभागी झाले होते .शेवटच्या दिवशी चार संघात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या .त्यात सर्व संघापेक्षा अतिशय दिमाखदार असे गोल्फ खेळाचे प्रदर्शन करीत या वर्षीच्या अतिशय नावजलेला ऑक्सफर्ड गोल्फ चषक शुभान सनराएजेस या संघाने पटकावला आहे .यावेळी गोल्फ इंडस्ट्री असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर ,एस गोल्फिंग चे आदित्य मालपाणी, आयोजक रोहन सेवलेकर,कौशिल वोरा यासह राष्ट्रीय खेळाडू व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
शुभान सनरायजरस 2025 च्या चषकाचा मानकरी ठरला या संघाने दहा लाखाचे भक्षीस मिळवले .विजयी संघात प्रमुख खेळाडू जॉन विल्कॉक्स,यश वाधवन,अवनय खन्ना,बिजय लेंका,दीपक द्विवेदी,यश शहा,दीपक आनंद,अनिरुद्ध इंदूरकर,गिरीश शिळमकर,दीपक कुमार,अभिजीत गानू,किरण प्रकाश शहा,यशवंत झांजगे,जितेंद्र शहा,कु.अनुराधा बंबवाले हे विजयी संघात सहभागी होते .
तर ईगल फोर्सेस ने उपविजेता संघ ठरला त्याने साडेसात लाकाचे बखीस मिळवले .द्वितीय क्रमांक पुना लायन्स संघाने मिळवित पाच लाखाचे भक्षीस मिळवले तसेच रोअरिंग टायगर्स नागपूर ने तृतीय क्रमांक मिळवित तीन लाखाचे बक्षीस मिळवले.
गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा समजली जाते .ही स्पर्धा 6 ते 13 एप्रिल दरम्यान पुण्यात पार पडली.यामध्ये एकूण 12 संघ आणि 180 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते .या स्पर्धेचा पारितोषिक वितरन समारंभ आज पुण्यातिल प्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट lयेथे पार पडला.
अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रिमीअर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळाला.या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध संघ सहभागी होत आहेत .पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीग 2025 चे सर्व सामने पार पडले .त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफोर्ड गोल्फ लीग मध्ये पुणेकराना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळाले.या राष्ट्रीय लीग च्या सामन्यासाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.
या ऑक्सफर्ड प्रीमियर लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत .आजपर्यत्न ईगल फोर्सेस ,बिनधास्त बॉईज ,सुलतान स्विंग्स ,ब्लिस्ट्रिंग बर्ड्स ,झिंगर्स,ग्रीन गॅडीटर्स,सुझलोन ग्रीन्स,रोरिंग टायगर्स, पुना लायन्स,सुब्बन सनरायजर्स ,द लीगशी क्लब ,बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले होते .

