Homeपुणेपुण्यात सुखसागरनगर येथे राठी परिवाराच्या वतीने संत आशीर्वचन व भजन संध्याचे आयोजन

पुण्यात सुखसागरनगर येथे राठी परिवाराच्या वतीने संत आशीर्वचन व भजन संध्याचे आयोजन

Newaworldmarathi Pune: पुण्यातील सुखसागरनगर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण करणारा संत आशीर्वचन व भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ब्रह्मकालीन परम पूज्य संत महंत श्री अभयरामजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होणार असून, रामस्नेही संप्रदायाचे खेडापा पीठाचार्य श्री 1008 श्री पुरुषोत्तमदासजी महाराज तसेच परम पूज्य संत महंत डॉ. श्री रामप्रसादजी महाराज (श्री बडा रामद्वारा, सुरसागर, जोधपूर) यांच्या पावन सान्निध्यात हा सोहळा पार पडणार आहे.

श्रीमती मेनाबाई धनराजजी राठी यांच्या पुढाकारातून आणि चुन्नीलाल राठी, मगराज राठी, राजेश राठी, रविंद्र राठी, जितेंद्र राठी, महेश राठी, जुगल राठी व राठी परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नामस्मरण, सत्संग, संत महापुरुषांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हा कार्यक्रम गुरुवार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत “धनराज निवास”, हेमा मंगल कार्यालय, सुखसागरनगर, पुणे येथे होणार आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments