Newsworldmarathi Pune : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्याने दोन अनाथ मुलींना पुण्यात नोकरीला लावतो असे सांगून पुण्यात आणले. तुमचा शिक्षणाचा खर्च करतो असे सांगत स्वतःच्या फ्लॅटवर ठेवले आणि दोघींवर बलात्कार केल्याची धकादायक बातमी समोर आली आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराअंतर्गत पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने याप्रकरणी त्याला 5 दिवसांची पोलील कोठडी सुनावली आहे.
शंतनू याने दोन अनाथ मुलींना काही महिन्यापूर्वी पुण्यात आणले होते. शिक्षणाचा खर्च, नोकरी याचे आमिष त्या मुलींना दाखवले. आणि स्वतःच्या फ्लॅटवर ठेवले. या दोन्ही मुलींवर त्याने बलात्कार केला. मुलींनी धाडस दाखवत समर्थ पोलीस स्टेशनं मध्ये घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर शंतनू वर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.


Recent Comments