Homeपुणे“Shining Star” फॅशन शो पुण्यात रंगणार

“Shining Star” फॅशन शो पुण्यात रंगणार

Newaworldmarathi Pune : शहरात फॅशन आणि ग्लॅमरचा जल्लोष अनुभवण्यासाठी “Shining Star” हा भव्य फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स अशा विविध गटांसाठी हा स्पर्धात्मक कार्यक्रम खुला असून सहभागींसाठी मोठ्या संधींचे दार उघडणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना सोन्याची नथ, रोख बक्षिसे, क्राउन तसेच टॉप १० विजेत्यांना सिल्व्हर कॉइन देण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागींसाठी सेलिब्रिटी, रील स्टार्स, व्यावसायिक व्यक्तिमत्त्वे आणि दिग्दर्शकांशी भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच जाहिराती, चित्रपट, फोटोशूट, गाणी आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधीही मिळू शकते.

हा भव्य कार्यक्रम अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम येथे २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांकडून संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.

“Shining Star” फॅशन शोचे आयोजन नेक्स्टस प्रॉडक्शन आणि चंदुकाका सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर “Newsworld मराठी” असून, फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांसाठी हा एक मोठा मंच ठरणार आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments