देवेंद्र फडणवीस यांचे काम आम्हा सर्वांसाठी आदर्श – आ. अमित गोरखे
Newsworld Mumbai : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, शाश्वत विकासाचे विकासपुरुष देवेंद्र फडणवीस यांची भाजपा महाराष्ट्र “विधिमंडळ गटनेतेपदी” निवड झाल्याबद्दल विधानपरिषद आमदार मा.उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे,आमदार शंकर जगताप यांनी सागर निवास्थानी जाऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या!
देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने आणि निर्णयक्षमतेने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांची कार्यतत्परता, प्रामाणिकता आणि समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेले काम आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र समृद्धीच्या आणि विकासाच्या नव्या उंचीवर जाईल तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
पीएमसी बँकेतील ग्राहकांना लवकर न्याय द्या: खा. वायकर
Newsworld Delhi : आरबीआई यंत्रणेच्या असफलतेमुळे पीएमसी बँक घोटाळ्यातील ग्राहकांचे हक्काचे कोट्यवधी रुपये गेल्या अनेक वर्षापासून अडकले असून ते त्यांना तत्काल देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेऊन खातेदारांना न्याय द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक २०२४ वर बोलताना केली. खातेदारांच्या न्याय, हित रक्षणासाठी तसेच सहकारी बँकेतिल ग्राहकांसाठी डिपॉजिट इन्शुरेंस योजना लागू करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकसभेत मांडण्यात आलेल्या बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक २०२४ चे समर्थन करताना खासदार रविंद्र वायकर यांनी आपले विचार व सूचना मांडल्या. पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे ग्राहकांनी आपल्या मेहनतीचे बँकेत ठेवलेले रुपये मिळणे कठीण झाले आहे. आरबीआई यंत्रणेला हा घोटाला रोखण्यात अपयश आले. यूनिटी बँकेतील ग्राहकांची पण तीच परिस्थिति आहे.
यस बँकेला केवळ २० दिवसांमध्ये १५०० कोटी रुपये देऊन वाचवण्यात आले. परंतु पीएमसी बँक ज्यांचा एनपीए ६००० हजार करोंड होता व ज्यांचे १० लाखापेक्षा जास्त ग्राहक होते, आशा ग्राहकांना बेलआउटचा लाभ देण्यात आला नाही.
एचडीआयएल कंपनीची संपत्ति व कर्जाच्या एकदाच सेटेलमेन्ट मूळे हजारो कोटी रुपयांची वसूली झाली आहे. हे संकट नुसते वित्तीय नसून, नैतिक आणि सामाजिक पण असल्याचे मत, खासदार वायकर यांनी व्यक्त केले. या घोटाळ्याची बंधित ग्राहकांना त्यांची संपूर्ण जमा रक्कम तत्काळ देण्यात यावी. एनसीएलटी सारख्या संस्थेमार्फत अशी प्रकरणे निकाली काढण्यात यावी. बँकेतील एनपीए खात्यांची ओळख करण्यासाठी रिस्क मॅनेजमेंट सिस्टमला सक्षम करण्यात यावे. सायबर फसवणुकीपासून ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी बँकांना एआय वर आधारित सुरक्षा प्रणाली लागू करण्यात यावी.
ग्रामीण भागात बँकांचे जाळे वाढवणे तसेच एटीएमची संख्या वाढवण्यात यावी. सहकारी बँकांना आधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष फंड उभारला पाहिजे, आशा सूचनाही खासदार रविंद्र वायकर यांनी या बिलावर आपले मत व्यक्त करताना दिल्या.
आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने ‘कचरामुक्त कसबा’
Newsworld Pune : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी भवानी पेठ क्षेत्रातील कचऱ्याच्या समस्येवर त्वरित कारवाई केली आहे. त्यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या ‘क्रॉनिक स्पॉट्स’बाबत प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर महापालिकेने आठवड्याच्या आतच या समस्येवर उपाययोजना केल्याचा दावा केला आहे.
पालिकेच्या या कृतीमुळे भवानी पेठ परिसरातील कचऱ्याच्या समस्येत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही कृती नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत असून, स्वच्छता अभियानासाठी सकारात्मक पाऊल मानले जात आहे. आमदार रासने यांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्वाची छाप पडल्याचे दिसत आहे.
आमदार हेमंत रासने यांनी ‘कचरामुक्त कसबा’ या मोहिमेअंतर्गत भवानी पेठ भागातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत उघड्यावर कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली आणि या समस्येच्या त्वरित सोडवणुकीसाठी प्रशासनाला १५ दिवसांत कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
महापालिकेने या सूचनेनुसार हालचाली सुरू केल्या असून भवानी पेठ क्षेत्रातील काही ‘क्रॉनिक स्पॉट्स’ आठवड्याभरातच बंद करण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे परिसरातील स्वच्छता सुधारण्यास मदत होईल, तसेच भविष्यात कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन होण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या जातील. ‘कचरामुक्त कसबा’ ही कल्पना नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास महत्त्वाची ठरणार आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारितील ताडी गुत्ता, गंज पेठ, गुरुवार पेठ दवाखाना आरोग्य कोठी आणि चांदतारा चौक परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या भागातील ‘क्रॉनिक स्पॉट’ बंद करून, महापालिकेने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले आहे.
या मोहिमेमुळे भवानी पेठ क्षेत्रातील स्वच्छता स्थितीत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. ‘कचरामुक्त कसबा’ या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील कचऱ्याच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विशेष बैठकीसाठी बोलावले होते. या पाहणीत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम, तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.
रासने यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या दूधभट्टी, गणेश पेठ, गंज पेठ रोड, भिकारदास मारुती चौक आणि रमणबाग प्रशाला याठिकाणी थेट पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आणि नागरिकांपर्यंत नियमित कचरा संकलनाची व्यवस्था पोहोचवण्याचे आदेश दिले.
या पाहणीनंतर महापालिकेने ‘क्रॉनिक स्पॉट्स’ बंद करण्यासाठी पुढाकार घेतला असून, कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. ‘कचरामुक्त कसबा’मोहिमेला या पाहणीमुळे अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे.
कसबा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. कसबा मतदारसंघातून देशाला दिशा देणारे असे अनेक थोर महापुरुष घडले आहेत. अनेक ऐतिहासिक वास्तू या कसबापेठेत आहेत त्याचं पावित्र्य जतन करणे हे माझं आद्य कर्तव्य मी मानतो. देश विदेशातून अनेक नागरिक कसबा पेठ पाहण्यासाठी येत असतात. माझा मतदारसंघ स्वच्छ सुंदर रहावा ही माझी इच्छा आहे. त्यामुळेच आमदार झाल्यानंतर कसबा कचरामुक्त करण्याची पहिली मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी झाली आणि इथून पुढेही अशा अनेक संकल्पना राबवून मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे.
हेमंत रासने, आमदार
पैलवान विक्रमचा व्यायाम करताना मृत्यू
Newsworld Pune : मुळशीच्या माण येथील राष्ट्रीय खेळाडू कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी याचे आज सकाळी जिममध्ये व्यायाम करताना आकस्मिक निधन झाले. पैलवान विक्रम याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण माणगावसह मुळशी तालुक्यावर आणि कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पैलवान विक्रम पारखी याचे येत्या 12 डिसेंबरला लग्न होणार होते, मात्र काळाने त्याआधीच झडप घालून विक्रम ह्याला हिरावल्याने पारखी कुटुंबावर आनंदा ऐवजी दुःखाचा डोंगर कोसळलाय. पारखी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखामुळे मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पैलवान विक्रम पारखीने अनेक पदकं मिळवली
मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपलं नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. २८ नोव्हेंबर २०१४ ला वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४ झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले.
काळाचा घाला… 8 दिवसावर लग्न…
पैलवान विक्रम चे 8 दिवसांवर लग्न असताना नियतीचा अमानुष खेळ..पैलवान विक्रम याचे जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार होते. या दुर्दैवी घटनेने कुस्ती क्षेत्रात आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे
पवना धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू
Newsworld Pune : पवना धरणात दोन तरुण बुडाले आहेत. बुधवार (दि.०४) रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास दुधिवरे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. मयूर रविंद्र भारसाके (वय २५) तर तुषार रविंद्र अहिरे (वय.२६ दोघेही सध्या रा.पुणे, मुळ, रा. लालजैन मंदिराच्या पाठिमागे, पद्मावती नगर, वरणगांव, भुसावळ) असे बुडाल्या पर्यटकांची नावे असून ते बालेवाडी येथे एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत होते.मयुरचा मृतदेह सापडला आहे मात्र तुषार चा मृतदेह अद्याप मिळून आला नाही. उद्या सकाळी 9 वाजता परत शोध मोहीम चालू होईल.
‘रिकन्स्ट्रक्टीव्ह युरोलॉजी’वर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
Newsworld Pune : मूत्राशयाच्या किचकट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक, मूत्राशय व प्रोस्टेट संबंधित गुंतागुंतीचे आजार, तसेच आधुनिक उपचार पद्धती याविषयी चर्चा करण्यासाठी बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वतीने दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजिली आहे. येत्या ७ व ८ डिसेंबर २०२४ रोजी ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, युरोलॉजिस्ट डॉ. पंकज जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, “दोन दिवसांच्या या कार्यशाळेत जवळपास ३५ ते ४० शस्त्रक्रिया होणार असून, ‘युरोकुल’मध्ये होणाऱ्या या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण बंतारा भवन येथील सभागृहात जगभरातून आलेले युरोलॉजिस्ट पाहणार आहेत.
डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. पंकज जोशी यांच्यासह लंडन येथील प्रा. अँथनी मंडी, इटली येथील डॉ. गुइडो बार्बगली, तामिळनाडू येथील डॉ. गणेश गोपालकृष्णन, लंडन येथील ज्युलियन शाह, डॉ. मिरोस्लाव्ह दोर्डोव्हिक, कतार येथील डॉ. तारिक अब्बास, अमेरिकेतील डॉ. ली झाह, डॉ. दिमित्री निकोलावास्की या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा होणार आहे. भारतातील पाचशे, तर विदेशातील ८० तज्ज्ञ युरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.”
‘युरेथ्रोप्लास्टी’मुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही मुलांना जन्मतःच मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते. अशा रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. तसेच संभोग करण्यास पुरुषाचे लिंग जर अकार्यक्षम असेल, तर रुग्णाच्या शरीरात ‘थ्री पीस पिनाईल प्रोस्थेसिस’ हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते. त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोषाजवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर पुरुषाचे लिंग ताठ होते आणि तो संभोग करण्यास सक्षम होऊ शकतो, असे डॉ. संजय कुलकर्णी यांनी नमूद केले.
पुरुषांचे लिंग जर ताठ झाल्यावर वाकत असेल, तर तेही ऑपरेशन करून सरळ करता येते. याला ‘पेरोनीज डिसीज ‘असे म्हणतात. ऑपरेशननंतर पेशंटची लघवी गळत असेल, तर लघवीच्या मार्गाभोवती आर्टिफिशियल स्नायू बसवला जाऊ शकतो, जेणेकरून पेशंटचे लघवी गळणे थांबते, हेही ऑपरेशन युरोकूलमध्ये केले जाते. अपघातामध्ये किडनी व लघवीची पिशवी जोडणारी नळी तुटली व पोटात लघवी होऊ लागली तर त्या रुग्णाची नाजूक नळी परत जोडण्याचे ऑपरेशन रोबोटच्या साह्याने केले जाणार आहे. जगातील सर्वात अद्ययावत टेक्नॉलॉजी, रोबोटिक सर्जरी युरोकुलमधे मागील दीड वर्ष होत आहेत. ही शस्त्रक्रिया ‘दा विंची रोबोट’ वापरून केली जात आहे. या कार्यशाळेत विविध प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया रोबोटमार्फत केल्या जाणार आहेत, असे डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले.
*’युरोकुल’ची बांधिलकी’*
युरोलॉजी’ व ‘नेफ्फरोलॅाजी’साठी समर्पित १०५ बेडचे ‘युरोकुल’ भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. या सामाजिक बांधिलकीमुळे देश-विदेशातील रुग्णांमध्ये ‘युरोकुल’ आपलेसे झाले आहे. जगातील सुमारे ५० देशांमध्ये जाऊन प्रात्यक्षिकांसह ‘युरेथ्रोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करणारे डॉ. संजय कुलकर्णी ‘युरोकुल’चे प्रमुख आहेत, असे डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी सांगितले.
प्राध्यापक डॉ. स्वाती कर्वे यांचे निधन
Newsworld Pune : मराठीच्या अभ्यासक-संशोधक स्वाती सुहास कर्वे (वय ७२) यांचे दीर्घकालीन आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पती, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. चिंचवड येथील फत्तेचंद विद्यालयात व पुण्यातील शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अध्यापन केले होते.
स्वाती कर्वे यांनी ललित, वैचारिक, समीक्षा व संशोधनात्मक लेखन केले असून ‘दशावतार’, ‘भारतीय सण व उत्सव’, ‘चिरंजीव’, ‘पंचकन्या’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप’, ‘आठवणीतील पुस्तके’, ‘दळवींची नाटकेः एक अंतर्वेध’, ‘स्त्रियांच्या परिषदांचा इतिहास’ (१८५० ते २०१०) ही समीक्षात्मक पुस्तकेही त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘स्त्री विकासाच्या पाऊलखुणा’ (१९५० ते २००७), ‘स्त्री विकासाचे नवे क्षितिज’ (१९५० ते २००७) हे स्त्रियांच्या वैचारिक लेखनाचे दोन खंड त्यांनी संपादित केले होते. ‘स्त्रियांच्या पत्रव्यवहाराचे सामाजिक मूल्यमापन’ या प्रकल्पाला महाराष्ट्र फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अभ्यासू संशोधक व समीक्षक म्हणून त्या साहित्य वर्तुळात परिचित होत्या.
कर्वे यांच्या दोन ग्रंथांना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार, आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार, ना.ह. आपटे पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळाले होते.
चीनमध्ये लोकशाही अस्तित्वात आली तर भारताला फायदा – धर्माधिकारी
Newsworld Pune : चीनने 1950 साली तिबेटवर आक्रमण केले त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी चीन कडून धोका असल्याचे म्हंटले होते. मात्र पुढे पं. जवाहरलाल नेहरूंनी हिंदी – चीनी भाई भाई ची घोषणा दिली, पुढे 1962 साली आपल्याला किंमत चुकवावी लागली. अलीकडे गलवान मध्ये तसे करण्याचा प्रयत्न केले मात्र आजच्या भारताने आरे ला कारे उत्तर दिले. आजच्या परिस्थितीत चीनमध्ये लोकशाही अस्तित्वात आली तर भारताला आणि जगाला देखील फायदा होईल असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
चेतक बुक्सने प्रकाशित केलेल्या आणि पराग देव यांनी लिहिलेल्या ‘ड्रॅगनच्या लोकशाहीची प्रेमकथा’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्माधिकारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी लेखक पराग देव, अनय जोगळेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. मोरे म्हणाले, बौद्ध धम्म चीन मध्ये गेला त्यावेळी अनेक चीनी अभ्यासक, विचारवंत भारतात आले, त्यांनी आपल्या देशाचा अभ्यास केला, इथले आणेक ग्रंथ चीनी, तिबेटी मध्ये अनुवादित केले. आपल्याकडे परकीय आक्रमणा नंतर अनेक ग्रंथ नष्ट झाले मात्र ते तिकडे उपलब्ध आहेत, त्यांचे आपल्याकडे पुन्हा येणे गरजेचे आहे. जागतिक राजकारणावर भाष्य करणारी ही कादंबरी योग्य वेळी प्रकाशित झाली असून ती इंग्रजी मध्ये भाषांतरीत व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
जोगळेकर म्हणाले की भारताच्या शेजारी असलेला आणि जागतिक राजकारणात महत्वाचा देश असलेल्या चीन बद्दल आपल्याला फार काही माहिती नसते पण अशा स्वरूपाच्या कादंबरीमुळे आपल्याला शेजारच्या देशाबद्दल नक्कीच माहिती मिळू शकते.
लेखक पराग देव यांनी मनोगत व्यक्त करताना पुस्तकामागील प्रेरणा आणि भूमिका मांडली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन
Newsworld Pune : संपत्ती व समृद्धीसाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या गोष्टींची जाणिव करून देण्याचे काम वन्नेस मूव्हमेंटच्या वतीने करण्यात येते. वन्नेस मूव्हमेंटचे संस्थापक मुक्ती गुरु श्री. कृष्णाजी यांच्या “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” या कार्यक्रमाचे आयोजन येत्या 8 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आल्याची माहिती वन्नेस मूव्हमेंटच्या महाराष्ट्र प्रमुख रोमा दासाजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला ॲड वसंत पाटील, उद्योजक दत्ता बोडके, तृप्ती शहापूर, शेफ सर्वेश जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमांबद्दल अधिक माहिती देताना रोमा दासाजी म्हणाल्या, कृष्णाजी, त्यांच्या पत्नी प्रीताजी यांच्यासह, वन्नेस संस्थेचे सह-संस्थापक आहेत. ते ज्ञानी ऋषी आणि गूढवादी, चेतनेचे तंत्रज्ञ आणि ज्ञानाचे जागतिक केंद्र असलेल्या एकमचे सह-संस्थापक आहेत. त्यांनी ध्यान, अंतर्दृष्टी, प्रक्रिया आणि पद्धतींची संपूर्ण परिसंस्था स्थापन केली आहे. जी असंख्य समस्यांचे निराकरण करण्यात, विपुलतेला चालना देण्यासाठी आणि व्यक्तींना चेतनेच्या शक्तिशाली अवस्थेत मार्गदर्शन करण्यास मदत करते. ते जागतिक नेते, साधक आणि जगभरातील लाखो तरुणांना मार्गदर्शन करतात. प्रबोधनाची उत्कट इच्छा जागृत करण्यासाठी ते सध्या 6 खंडांमध्ये जगाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या जागतिक दौऱ्याचा एक भाग म्हणून पुणे शहराला भेट देत आहेत.
मुक्ती गुरु श्री.कृष्णाजी यांच्या नेतृत्वाखालील हा ४ तासांचा “एक्सपिरीयन्स एनलाईटेनमेंट” कार्यक्रम तुमच्यासाठी ऐश्वर्य चैतन्याचे एक प्रवेशद्वार म्हणून कार्य करते. तुमची आंतरिक स्थिती तुमच्या जीवनात घटना आणि परिस्थिती यावर भाष्य करते. जर तुम्ही संकटाचे, समस्यांचे प्रगतीमध्ये रूपांतर करू इच्छित असाल तर चैतन्याच्या शक्तिशाली अवस्थेला जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम एक प्रेरणा असेल.
८ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ४ ते रात्री ८ यावेळेत मुहूर्त लॉन्स सर्व्हे क्र. १२६, फ्लेम रिंग रोड, खंडोबा मंदिराजवळ, मुंडे वस्ती, बावधन, पुणे येथे होणार आहे. उद्योजक, व्यावसायिक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, ध्यान करणारे व्यक्ती किंवा आर्थिक व वैयक्तिक बदल शोधणाऱ्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम उपयुक्त असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असल्याचे रोमा दासाजी यांनी सांगितले.
फडणवीसांच्या निवडीचा पुणे भाजपकडून जल्लोष
Newsworld Pune : भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्या निमित्त पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतः ढोल वादन करत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्या निमित्त आनंद साजरा केला.
यावेळी पुणे शहर सरचिटणीस , ,पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, सुभाष जंगले,वर्षा तापकीर, प्रमोद कोंढरे,,रवींद्र साळे गावकर गणेश घोष,माजी नगरसेवक जयंत भावे आदित्य माळवे, अजय खेडेकर, राजेंद्र काकडे, पुष्कर तुळजापूरकर,राजू परदेशी ,प्रणव गंजीवाले, उमेश शाह, दिलीप उंबरकर, संदीप काळे उपस्थित होते.
घाटे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहे. राज्यातील युवक आणि महिला यांचा सन्मान आणि उद्धार करण्यासाठी फडणवीस यांची निवड पदावर करण्यात आली आहे. राज्यातील लाडकी बहीण यांना त्यांचा हक्काचा देवाभाऊ मिळणार आहे. पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी असे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शपथविधीसाठी उद्या मुंबई मध्ये जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन यापुढील काळात वाटचाल करतील. 2014 ते 2019 या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे राज्याची धुरा सांभाळलेली आहे .त्यामुळे ते पुन्हा एकदा चांगल्याप्रकारे राज्याला विकासाच्या वाटेवर नेतील असा विश्वास राज्यातील जनतेला आहे. लाडक्या बहिणी सोबत लाडके भाऊ देखील भाजपच्या पाठीशी विधानसभा निवडणूकीत राहिलेली आहे. महायुतीला राज्यात ऐतिहासिक यश मिळालेले असून विरोधकांचा सुफडा साफ झालेला आहे.

