अजितदादांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल पर्वती मतदार संघात पेढे वाटप

0
Newsworld Pune : मा. अजित पवार यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मोठा उत्साह व्यक्त करण्यात आला. मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून आनंद साजरा केला. या कार्यक्रमाचे आयोजन युवक उपाध्यक्ष करण गायकवाड आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केले होते. कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दादांच्या यशाचा आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला. पर्वती मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय यशाबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास गतीमान होईल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास संतोष नांगरे यांनी व्यक्त करण्यात आला.

7 डिसेंबरला विधिमंडळाचं अधिवेशन

Newsworld Mumbai :महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महायुतीच्या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर 7 डिसेंबरला विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी अखेर राज्यात नव्या सरकारची स्थापना झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मंत्रालयात घडामोडींना वेग आला आहे. सरकार स्थापनेनंतर आता पुढच्या दोन दिवसांनी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कांद्याचे उत्पादन वाढले, शेतकऱ्यांना काय मिळाले?

0
Newsworld Team : भारतात कांद्याची शेती जवळपास सर्व राज्यांमध्ये होते. २०२३ – २४ मध्ये देशात एकूण २४२ लाख टन कांद्याचं उत्पादन झालं. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २० टक्के कमी आहे. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे. महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील ४३ टक्के कांद्याचं उत्पादन होतं, तर दुसऱ्या स्थानी कर्नाटक आणि तिसऱ्या स्थानी गुजरात आहे. कांद्याचे प्रकार 1 गोड कांदा
2 पिवळा कांदा
3 लाल कांदा
4 पांढरा कांदा
5 शॅलोट्स
6 हिरवा कांदा
7 मोती कांदा
8 टॉरपीडो कांदा
9 बरमुडा कांदा
10 सिपोलिनी कांदा
11 स्पॅनिश कांदा
12 इजिप्त कांदा
13 रेडविंग कांदा
14 माउ कांदा
15 विडालिया कांदा कांद्याचा राखीव साठा कुठे राखीव साठ्यातील कांदा बाजारात का आणला जात नाही, हा प्रश्नच आहे. मुळात राखीव साठ्यासाठी केलेल्या खरेदीत मोठा गैरव्यवहार आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून जास्तीत -जास्त ५० ते ५५ रुपये दराने व्यापारी कांदा खरेदी करतात, तो कांदा मुंबईत येईपर्यंत शंभर रुपये किलो कसा होतो. सरकारचे कांदा खरेदीवर नियंत्रण असते, मग कांदा विक्रीवर का नियंत्रण ठेवले जात नाही. सरकारच्या आशीर्वादाने दरवर्षी शेतकरी आणि ग्राहकांची लूट करून व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे केले जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे, असे मत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने ग्राहकांना स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण: गेल्या आठवड्यात लाल कांद्याला प्रति क्विंटल 4 हजार 300 रुपये भाव मिळाला होता. आज त्याचं कांद्याला सरासरी 3 हजार 500 रुपये भाव मिळाला आहे. कांदा दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाले असून लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. एकीकडे ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावर करपा आणि बुरशीजन्य रोग लागत असतांना त्यावर महागडी औषधे मारावी लागत आहे. तर दुसरीकडे कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी दोन्ही बाजूने होरपळला जात आहे. मागील आठवड्यात लाल कांदा भाव(प्रति क्विंटल) कमीत कमी    – 1500 रू 
जास्तीत जास्त – 5500 रू 
सरासरी  –   4300 रू  आजचे लाल कांदा भाव..
कमीत कमी   –  1000 रू 
जास्तीत जास्त –  5101रू 
सरासरी –   3500 रू फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने कांद्याची आवक वाढली: चक्रीवादळामुळे पावसाची भिती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदा बाजारात आणला आहे. दरम्यान, कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. सर्वसाधारण कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार ते तीन हजार रुपये भाव मिळतो आहे. तर उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे.  दुसरीकडे, तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसात जवळपास 850 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. काय भाव मिळाला? सोमवारी लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2600 रुपये, बारामती बाजारात 5000 रुपये, येवला बाजारात 2900 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 3800 रुपये तर देवळा बाजारात 3500 रुपये दर मिळाला. कांदा दरात सुधारणा होण्या ऐवजी घसरण सुरु झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परिणामी, लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी ५८७ गाड्यांतून आला मार्केट यार्डात कांदा आला. ३०० गाडया भरून कांदा आवक सरासरी गेल्या आठवडपात होती. शेतकऱ्यांना १००० हजार ते ५००० हजार रुपये मिळाले. जुन्या कांद्याला साधारण ५००० हजार रुपये भाव मिळाला होता. सोमवारी मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातून कांदा मोठ्या प्रमाणात सोलापुरात आला आहे. आगामी काही दिवसात अजून कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे. यामुळे कांदा दरवाढ १) दिवाळीनिमित्त नाशिकमध्ये कांदा – विक्री आठवडाभर बंद होती २) गेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम संपल्यामुळे आवक घटली ३) काढणीला आलेला खरीप कांदा परतीच्या, बिगरमोसमी पावसामुळे सडला ४) खरीप कांद्याच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट नाशिक येथील शेतकरी रोहित पाटील यांनी दीड एकरमध्ये कांद्याची लागवड केली होती. नोव्हेंबरमध्ये ते काढणीवर आले असते. तत्पुर्वीच पावसात रोपे वाकडेतिकडे होऊन गेले. साधारण परिस्थितीत ५० ते ६० क्विंटलचे उत्पादन झाले असते. आता १० ते २० क्विंटल कांदे निघाले आणि दर असेच राहिले तरच लागवडीसाठी केलेला ४० हजार रुपयांचा खर्च भरून निघू शकेल, असे ते सांगतात. पावसाने केवळ पिकाचे नुकसान झाले नाही तर, उन्हाळ कांद्याची रोपे खराब केली. ६४२ हेक्टरवरील कांदा रोपवाटीकेचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामुळे पुन्हा बियाणे खरेदी करून रोपे तयारी करावी लागतील. पुढील उन्हाळ कांद्याच्या लागवडीला उशीर होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दादा तू यशस्वी हो….

Newsworld Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेण्यापूर्वी अजित पवार यांच्या आई आशाबाई पवार यांनी त्यांचे औक्षण करून शुभाशीर्वाद दिले. ही भावनिक आणि कुटुंबीयांसाठी विशेष क्षणांची घटना त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अजित पवार हे आपल्या कुटुंबासाठी विशेष जिव्हाळा बाळगणारे नेते म्हणून ओळखले जातात. शपथविधीच्या आधी त्यांच्या आईने औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी अजित पवार भावुक झाले होते. अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, ज्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आणखी एक विक्रम नोंदला गेला. त्यांच्या आईच्या आशीर्वादामुळेच त्यांनी इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असल्याचे मत त्यांच्या निकटवर्तीय व्यक्त करत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांच्या आईचे औक्षण हे केवळ एक पारंपरिक सोहळा नव्हे, तर त्यांच्या आयुष्यातील कुटुंबाच्या महत्त्वाचा प्रत्यय देणारा क्षण ठरला आहे.

एकनाथ शिंदेनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

0
Newsworld Mumbai : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात** शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. शपथविधी सोहळ्यास विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मान्यवर, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि भाजपसह महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. हा सोहळा भव्य प्रमाणावर आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे मुंबईत राजकीय तसेच सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते. आता त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारून महायुती सरकारच्या धोरणांना गती देण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि निर्णयक्षमतेचा उपयोग राज्यातील प्रलंबित प्रकल्प आणि विकास कामांना दिशा देण्यासाठी होईल, अशी अपेक्षा आहे. **महायुतीचा हा शपथविधी सोहळा भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.**

अजित पवारांच्या नावे नवा रेकॉर्ड…

Newsworld Mumbai अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व असून त्यांनी सातत्याने आपल्या राजकीय कौशल्याने वेगळा ठसा उमटवला आहे. १९५९ साली जन्मलेले अजित पवार, ज्यांना ‘दादा’ म्हणून ओळखले जाते, हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या काकांच्या प्रेरणेतून झाली. राजकीय प्रवास: 1. सुरुवात :अजित पवार यांनी १९९१ साली पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवून आपली लोकप्रियता आणि राजकीय कर्तृत्व सिद्ध केले आहे. 2. महत्त्वाची पदे: जलसंपदा मंत्री:जल व्यवस्थापन आणि सिंचन प्रकल्पांसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. वित्त मंत्री:महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर त्यांनी प्रभाव टाकला, बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. उपमुख्यमंत्री: अजित पवार यांनी २०१० साली प्रथम उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर त्यांनी २०१२, २०१९, २०२१, २०२३ आणि आता २०२४ साली सहाव्यांदा हे पद भूषवले आहे. अजित पवार यांची कारकीर्द म्हणजे मेहनत, राजकीय कौशल्य आणि सतत बदलत्या राजकीय परिस्थितीत उभारी घेण्याचे उदाहरण आहे. सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत, ज्यामुळे त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना फोन

Newsworld Mumbai : महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना फोन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आज होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोनवरून दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस सरकारचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच इतर काही राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

नागालँडच्या शिष्टमंडळाकडून अजित पवारांना शुभेच्छा

Newsworld Mumbai : देवगिरी बंगल्यावर नागालँडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार व शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या भेटीत नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणाली आणि पक्षाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल देखील उपस्थित होते. या भेटीमुळे पक्षातील एकजूट आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या उपस्थितीवर भर देण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. ही भेट राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात असून, पक्षसंघटन आणि विविध राज्यांमधील समन्वय वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई

Newsworld Pune : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा महाराजांचा चंपाषष्टी उत्सव जेजुरी गडावर मोठ्या जल्लोषात आणि भक्तीभावाने सुरू आहे. काल (सोमवारी) या उत्सवाला भव्य सुरुवात झाली असून, राज्यभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होत आहेत. चंपाषष्ठी हा खंडोबा देवाचा विशेष उत्सव असून, या दिवशी खंडोबाची पारंपरिक पूजा, अभिषेक, महाप्रसाद, आणि विविध धार्मिक कार्यक्रम गडावर आयोजित केले जातात. जेजुरी गडावरची परंपरा, पिवळ्या हळदीच्या उधळणीसह साजरी होणारी हा उत्सवाची वैशिष्ट्ये भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. गडावरचा उत्सव फक्त धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो. जेजुरी गडावर सध्या भक्तांनी गर्दी केली असून, भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनानेही विशेष व्यवस्था केली आहे.