प्रभाग २२ मध्ये पाटील दाम्पत्याची ताकद वाढली; अर्चना पाटील व तुषार पाटील यांचा संभाव्य उमेदवारीमुळे भाजपमध्ये नवीन उर्जा

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपची स्थानिक पातळीवरील ताकद वाढवण्यात अर्चना पाटील आणि तुषार पाटील या दाम्पत्याने गेल्या अनेक वर्षांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संघटन बांधणी, कार्यकर्त्यांशी सतत संवाद, स्थानिक समस्या ओळखून त्या वेळेवर सोडवणे या त्यांच्या शैलीमुळे भाजपला प्रभागात भक्कम आधार मिळाला आहे. नगरसेविका म्हणून अर्चना पाटील यांनी केलेल्या ठोस विकासकामांची नोंद नागरिकांच्या मनात ठळकपणे आहे. रस्ते-विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला उपक्रम, आणि सार्वजनिक सुखसोयींच्या उभारणीसह अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
Oplus_16908288
प्रभागात तुषार पाटील आणि अर्चना पाटील यांचे काम प्रभावीपणे पुढे जाण्याचे मोठे कारण म्हणजे त्यांना मिळालेले मजबूत नेतृत्व. माजी खासदार संजय काकडे यांचा राजकीय पाठिंबा आणि माजी आमदार दिलीप कांबळे तसेच आमदार सुनील कांबळे यांचे मार्गदर्शन यामुळे पाटील दाम्पत्याची संघटनात्मक पकड अधिक मजबूत झाली आहे. २०१७ मध्ये अर्चना पाटील नगरसेविका म्हणून विजयी झाल्यापासून त्यांनी झोपडपट्टीतील नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर लक्ष केंद्रित केले. पाण्यासारख्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, तसेच पुनर्वसन या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने काम करत अनेक कुटुंबांना दिलासा दिला. युवकांसाठी रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुषार पाटील यांनी सक्रिय भूमिका घेतली, ज्यामुळे तरुण वर्गात त्यांच्याबद्दल सकारात्मकता निर्माण झाली. एकूणच, तळागाळातील संपर्क, सामाजिक सहभाग आणि समस्यांवर तत्पर प्रतिसाद यामुळे पाटील दाम्पत्याचे स्थान प्रभागात अधिक बळकट होत आहे. सध्या प्रभागात असे संकेत दिसत आहेत की आगामी निवडणुकीत अर्चना पाटील आणि तुषार पाटील दोघेही नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. या चर्चेला राजकीय रंग चढ़ला असून त्यातून स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, प्रभागात तुषार पाटील यांच्या तोडीचा दुसरा प्रभावी भाजप नेता नाही, अशी धारणा कार्यकर्त्यांत दृढ आहे. त्यामुळे जर त्यांना अधिकृत संधी मिळाली, तर भाजपला प्रभाग २२ मध्ये अधिक बळकटी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Oplus_16908288
अर्चना पाटील यांनी महिला आघाडी शहराध्यक्ष म्हणून काम पाहताना महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देत अनेक परिणामकारक उपक्रम राबवले. त्यांच्या नेतृत्वामुळे मोठ्या संख्येने महिलांचा भाजपमध्ये सहभाग वाढला आणि संघटनाची तळागाळातील पकड मजबूत झाली. त्यांनी महिलांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजांनुसार कार्यक्रम आखले, ज्यामुळे त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला. त्यांच्या कार्यशैलीचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांनीही कौतुक केले आहे. एकूणच, अर्चना पाटील यांनी संघटन विस्तार आणि महिला नेतृत्व बळकटीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अभ्यासू, तरुण आणि समस्यांवर थेट उपाययोजना करणारी नगरसेविका अशी अर्चना पाटील यांची ओळख आहे. दुसरीकडे, तुषार पाटील हे संघटनकर्ता म्हणून कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत. दोघांची राजकीय शैली परस्परपूरक असल्याने, प्रभागातील भाजपची स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या दृष्टीने हे समीकरण आव्हानात्मक ठरण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीचे वातावरण वाढत असताना, पाटील दाम्पत्याच्या संभाव्य उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभाग २२ मधील राजकीय समीकरणे आगामी दिवसांत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

निवडणुकीआधीच अजित पवारांचा मोठा विजय; 8 नगरसेवक बिनविरोध विजयी

0
Newsworldmarathi Baramati: बारामती नगरपालिकेतील अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने राज्यात राजकीय घडामोडींन वेग आला आहे. उमेदवारांमध्ये चढओढ पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी पक्षांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. तर दुसरीकेड बारामतीत दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष बारामतीच्या रणधुमाळीकडे लागले आहे. दरम्यान, बारामतीत निवडणुकीआधीच अजित पवारांना मोठे यश मिळाले आहे. नगरसेवक पदाच्या आठ जागा अजित पवार गटाच्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. बारामती नगरपरिषद निवडणुकीकरिता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता 300 हून अधिक विक्रमी अर्ज दाखल झाले होते. पालिका निवडणुकीमध्ये अपक्षांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 77 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. तर नगराध्यक्ष पदाकरता उभ्या असणाऱ्या दोन सदस्यांनी आपली उमेदवारी मागे घेतले आहेत. त्यामुळे, अजित पवार गटाला मोठे यश मिळाले असून निवडणुकीपूर्वीच आठ नगरसेवक निवडून आले आहेत. कोणत्या प्रभागातून कोण निवडून आले? प्रभाग क्रमांक 2 अ मधून अनुप्रिति तांबे प्रभाग क्रमांक 5 अ मधून किशोर मासाळ प्रभाग क्रमांक 6 अ मधून अभिजीत जाधव प्रभाग क्रमांक 8 अ मधून श्वेता नाळे प्रभाग क्रमांक 17 ब मधून शर्मिला ढवान प्रभाग क्रमांक 20 ब मधून आफ्रिन बागवान प्रभाग क्रमांक 18 अ मधून अश्विनी सुरज सातव प्रभाग क्रमांक 2 ब मधूनअनुप्रिता रामलिंग तांबे डांगे

संविधान दिनानिमित्त रंगणार ‘संविधान लोककला शाहिरी जलसा

0
Newaworldmarathi Pune: भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत शहरात “माझे संविधान – माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत भव्य संविधान लोककला शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला आहे. संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती व लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या शाहिरी जलशात प्रख्यात शाहीर शीतल साठे, सचिन माळी, तसेच सदाशिव निकम, पृथ्वीराज माळी आणि सहकारी कलाकार संविधान मूल्ये, सामाजिक समता आणि लोकशाहीची ताकद प्रभावी लोककलेद्वारे सादर करणार आहेत. हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, भाऊ पाटील रोड, बोपोडी येथे होणार असून या परसांगि प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)युवक आघाडीचे पप्पू कागदे, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, अविनाश कदम आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.   याच प्रसंगी “जनसेवेतून विकासाकडे” या कार्यअहवालाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. संविधान मूल्यांचे संवर्धन, लोककलांचा जागर आणि जनसेवेच्या कार्याचा आढावा या तिन्ही गोष्टींचा संगम असलेला हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करावे, असे आवाहन परशुराम वाडेकर यांनी केले आहे.

गोविंद पोफळेचा चमकदार खेळ; VIVA17 बास्केटबॉल स्पर्धेत अंडर-12 ‘बेस्ट प्लेयर’”

0
Newsworldmarathi Pune: VIBGYOR High, पिंपळे सौदागर यांच्या वतीने आयोजित VIVA17 Basketball Tournament 2025 उत्साहात पार पडली. सलग सतराव्या वर्षी आयोजित या स्पर्धेत पुण्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. U-14, U-12 आणि U-10 अशा तिन्ही वयोगटांत मुला–मुलींचे सामने खेळवले गेले. U-14 गटात 14 टीम्स, U-12 गटात 11 टीम्स तर U-10 गटातही चांगला प्रतिसाद मिळाला. U-12 बॉईज गटात सेंट मेरी स्कूलने विजेतेपद पटकावत दमदार खेळ सादर केला, तर या गटातील सर्वांची मने जिंकली ती गोविंद पोफळेने. त्याच्या उत्कृष्ट स्कोरिंग आणि खेळातील प्रभुत्वामुळे तो ‘बेस्ट प्लेयर’ म्हणून निवडला गेला. गोविंदला त्याचे स्पोर्ट्स टीचर्स अरुण चोपडे आणि विलास सुनगुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. दरम्यान, U-14 बॉईज विजेते VIBGYOR पिंपळे सौदागर तर U-14 गर्ल्स विजेत्या इंदिरा नॅशनल स्कूल ठरल्या. U-12 गटात मुलींच्या विभागात सेंट मेरी A विजेते, तर U-10 बॉईज आणि गर्ल्स या दोन्ही गटांमध्येही St. Mary’s ने विजेतेपद मिळवत आपला दबदबा कायम ठेवला. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेला खेळाडूपणा, टीमवर्क आणि शिस्त कौतुकास्पद ठरला. VIBGYOR High पिंपळे सौदागर यांच्या उत्कृष्ट आयोजनामुळे ही सतरावी स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

वेद भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे : परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज

0
Newsworldmarathi Pune: भारतीय संस्कृति ही वेदमूलक आहे. यामध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या उपासनेतूनच एक दिवस भारत माता विश्वगुरू होईल. खरंतर वेद हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री राहिलेले अशोक सिंघल हे ख-या अर्थाने वेदोपासक होते, असे गौरवोद्गार अयोध्या श्री राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी काढले. विश्व हिन्दू परिषदेचे संस्थापक सदस्य तथा श्री रामजन्म भूमि आंदोलनाचे अग्रणी अशोक सिंघल यांच्या पुण्यतिथी निमित्ताने भारतात्मा अशोक सिंघल वेद पुरस्कार दर वर्षी प्रदान केले जातात. याच शृंखलेत २०२५ चे पुरस्कार सोमवार १७ नोव्हेंबर २०२५ रोजी बीएमसीसी रोडवरील दादासाहेब दरोडे सभागृहात वितरित करण्यात आले. उत्कृष्ट वेद विद्यार्थी श्रेणीतील पुरस्कार हैदराबाद येथील श्री नोरी केदारेश्वर शर्मा, चेन्नईचे श्री अनंत कृष्ण भट्ट यांना आदर्श वैदिक शिक्षक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट वैदिक संस्था पुरस्कार आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम येथील श्री दत्तात्रेय वेद विद्यालयाला यांना तीन लाख, पाच लाख आणि सात लाख रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि आचार्य श्री प्रद्युम्न महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी व्यासपीठावर सिंघल फाऊंडेशन मार्गदर्शक रवींद्र मुळे, सिंघल फाऊंडेशन चे मुख्य विश्वस्त संजय सिंघल आणि सलिल सिंघल उपस्थित होते. कलाकार, खेळाडू आणि साहित्यिक यांचा या समाजात नेहमीच सन्मान केला जातो. मात्र , वेदांचे जतन आणि प्रचार करणाऱ्या वैदिक विद्वान वैदिकांचा मात्र विचार होत नाही. वैदिक विद्वान सर्वात जास्त काम करतात. म्हणूनच, भविष्यात वैदिक विद्वानांचा आदर करणे आवश्यक आहे. वैदिक विद्वान हे राष्ट्रीय कार्य करत आहेत. म्हणून, वैदिक विद्वानांचा आदर करणे म्हणजे राष्ट्राचा आदर करणे आहे. ही भावना गोविंद गिरी महाराज यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये वेद आणि वेदिक धर्माचे महत्व वाढले आहे, परंतु त्याची पुनर्प्रतिष्ठापना करणे गरजेचे आहे. अशा स्थितीत जे लोक वेदांचा प्रचार करीत आहेत, त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचे काम सिंघल फाउंडेशन करीत आहे, हे नक्कीच समाधानकारक आहे. कारण यातूनच वेदिकतेच्या सन्मानाची परंपरा मजबूत होईल. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना परमपूज्य आचार्यजी श्री प्रद्युम्नजी महाराज म्हणाले की, वेद आम्हाला कर्म शिकवतात आणि तेही निष्काम कर्म.आपल्या वैयक्तिक सुखाचा त्याग करून समाजात केवळ ज्ञानाला प्रवाहित करणे हे खरे वेद कर्म आहे. यातूनच वेदोपासकसुद्धा अंतर्बाह्य प्रकाशमान होत असतो. वेद आत्मसात करणे म्हणजे वेदांना समर्पित होण्यासारखे आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर शास्त्र वचनांचे पालन आणि सोबतच गुरू वचनांचे पालन करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संजय सिंघल म्हणाले की, अशोक सिंघल यांचे जीवन वेद आणि राम मंदिर संघर्षाची गाथा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सिंघल फाउंडेशनने वेद प्रसारासाठी काम करणा-यांचा सन्मान व्हावा यासाठी या पुरस्कारांची संकल्पना मांडण्यात आली. जेंव्हा सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमोर हा विषय मांडला, तेंव्हा त्यांनी या पुरस्काराचे नाव भारतात्मा असे सुचवले. याच नावाने अशोक सिंघल यांच्या कार्याला सुरू ठेवण्यासाठी हे पुरस्कार भविष्यात निरंतरपणे वितरित केले जातील. कार्यक्रमात सुरवातीला वेद वंदना आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पुरस्कारासाठी जूरी म्हणून काम करणा-यांचाही सत्कार गोविंददेव गिरी महाराज आणि आचार्य प्रद्युम्न महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम शर्मा यांनी केले आणि संजय सिंघल ने उपस्थित सर्वांचे आभार प्रकट केले. पुरस्कारासाठी जूरी आणि अनुशंसा समिती या पुरस्कारासाठी निवडल्या जाणाऱ्या ज्युरी समितीमध्ये मोरेश्वर विनायक घैसास- ऋग्वेद, पुणे, श्री कृष्ण पुराणिक- शुक्ल यजुर्वेद, गुवाहाटी, ए.एन. नारायण घनपाठी- कृष्ण यजुर्वेद वाराणसी, आर.चंद्रमौली श्रुती-सामवेद,चेन्नई, रमेशवर्धन- अथर्ववेद, गोकर्ण, कर्नाटक यांचा समावेश आहे. याशिवाय शिफारस समितीमध्ये गणेशवर जोगले- ऋग्वेद, गोकर्ण, कर्नाटक, कीर्तीकांत शर्मा, शुक्ल यजुर्वेद, दिल्ली, श्री कृष्ण मधुकर पळसकर, सामवेद, नाशिक, रामचंद्र जोशी, अथर्ववेद, तिरुपती यांचा समावेश होता.

पुण्याचा स्वानंद राजकुमार भोरे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक; मानसिक गणितात जागतिक भरारी

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील मनसुख भाई कोठारी नॅशनल स्कूलचा 15 वर्षीय विद्यार्थी स्वानंद राजकुमार भोरे यांनी मानसिक गणितातील अभूतपूर्व वेग सिद्ध करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद आपल्या नावावर केली आहे. जर्मनीतील पॅडरबॉर्न येथे 15 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित स्पर्धेत स्वानंदने 10-अंकी दहा मोठ्या संख्यांची मानसिक बेरीज—एकूण 1000 अंक—केवळ 1 मिनिट 28.40 सेकंदांत पूर्ण केली. ही जगातील सर्वात वेगवान मानसिक बेरीज ठरली असून ती अधिकृतरीत्या गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. लहान वयातच एवढ्या गुंतागुंतीच्या गणितांचे अचूक आणि झपाट्याने सोडवण्याची स्वानंदची क्षमता विलक्षण बुद्धिमत्ता आणि सातत्यपूर्ण परिश्रमाचे प्रतीक मानली जाते. गेल्या काही वर्षांत त्यांनी मानसिक गणित विश्वचषकात सलग जागतिक क्रमांक 1 (2023 व 2024) मिळवला आहे. तसेच अल्टरनेटिव्ह बुक ऑफ रेकॉर्ड्स, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांसह अनेक आंतरराष्ट्रीय मानांकने त्यांनी मिळवली आहेत. 2024 मधील मॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी जगात पहिला क्रमांक पटकावला. स्वानंदच्या प्रशिक्षकांच्या मते, त्यांचा फोकस, स्मरणशक्ती आणि मेंटल प्रोसेसिंग स्पीड हा त्यांच्या अद्वितीय यशाचा गाभा आहे. कोणताही दबाव न घेता गणिताला खेळाप्रमाणे हाताळण्याची त्यांची पद्धत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. स्वानंदच्या यशामागे कुटुंबाचा भक्कम आधार आहे. आई-वडिलांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना योग्य दिशा आणि प्रोत्साहन दिले. “स्वानंद लहानपणापासून आकडेमोडीत रमायचा; आम्ही फक्त त्याला पाठिंबा दिला,” असे त्यांचे पालक सांगतात. शाळेनेही त्यांच्या कामगिरीचे कौतुक करत, “स्वानंदसारखे विद्यार्थी शिक्षणक्षेत्रात नवा आदर्श निर्माण करतात,” अशी प्रतिक्रिया दिली. गिनीज रेकॉर्डनंतरही स्वानंदने पुढील जागतिक आव्हानांसाठी तयारी सुरूच ठेवली आहे. भारताचे, विशेषतः पुण्याचे नाव आणखी उंचावण्याचा त्यांचा संकल्प आहे.

प्रभाग २८ मधील महिलांना आनंदाची भेट; गदादे कुटुंबाच्या पुढाकारातून हरिहरेश्वर, श्रीवर्धन सहल

0
Newsworldmarathi Pune: कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवणारी आणि त्यांच्या मनातील स्वप्नांना पंख देणारी हरिहरेश्वर – श्रीवर्धन सहल प्रभाग क्रमांक २८ साठी अविस्मरणीय ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका प्रिया गदादे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गदादे आणि प्रेम गदादे यांच्या पुढाकारातून आयोजित झालेल्या या सहलीने महिलांच्या मनात आनंदाचा आणि समाधानाचा वर्षाव केला. रोजच्या संसाराच्या चक्रात, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडलेल्या या महिलांना स्वतःसाठी वेळ काढणेही कठीण. त्यामुळे ही सहल त्यांच्या आयुष्यात एक ताजेतवाने करणारी पर्वणी ठरली. पहाटेच उत्साहाने निघालेल्या या सहलीची सुरुवातच महिलांच्या आनंदाने झाली. बसमध्ये झालेल्या गप्पा, गाणी, हशा–टवाळक्या यांनी वातावरण अधिक रंगतदार झाले. अनेक महिलांसाठी ही सहल म्हणजे आयुष्यातील पहिल्यांदाच केलेला प्रवास होता. काहींनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, तर काहींनी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गटासोबत बाहेर पडण्याचा अनुभव घेतला. प्रवासादरम्यान नव्या ओळखी जुळल्या, जुन्या मैत्री घट्ट झाल्या आणि एकात्मतेची जाणीव अधिक दृढ झाली. या सहलीचे आयोजन करताना गदादे कुटुंबाने घेतलेली काळजी सर्वांच्या नजरेत भरली. प्रवास, भोजन, सुरक्षा, व्यवस्था—प्रत्येक गोष्टीची काटेकोर आखणी केल्यामुळे महिलांचा अनुभव अधिक सुंदर झाला. “आमच्यासारख्या कष्टकरी बायकांसाठी एवढं सुंदर आयोजन कोणी करेल असं वाटलंच नव्हतं,” अशी मनापासूनची भावना अनेकांनी व्यक्त केली. गदादे परिवाराची आपुलकी, त्यांचा जिव्हाळा आणि महिलांसाठीचा आदर याने सर्वांना भारावून टाकले. प्रभाग क्रमांक २८ मधील महिलांकडून या सहलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेक महिला कामामुळे, घरच्या परिस्थितीमुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे कधीच सहलीला जाऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला. “गदादे कुटुंबामुळे आमचं स्वप्न साकार झालं,” अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.

नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ‘एनएचएआय’ला आदेश; मुरलीधर मोहोळ यांचा पाठपुरावा

Newsworldmarathi Pune: मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना तातडीने आणि प्राधान्याने सुरू कराव्यात, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत, अशी माहिती पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. नवले पूल येथे नुकत्याच झालेल्या अपघातात आठ जणांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत हा अपघात व उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर मोहोळ यांनी ही माहिती दिली. ‘नवले पुलाजवळील अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट्स’ ची संख्या कमी करण्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती गडकरी यांना दिली.  त्यानंतरही नुकत्याच झालेल्या अपघातानंतर अधिक प्रभावी व तातडीची पावले उचलण्याची गरज असल्याकडे गडकरी यांचे लक्ष वेधले. तसेच या अपघातानंतर पुण्यात महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, पोलिस व महामार्ग प्राधिकरणासोबत घेतलेल्या बैठकांमध्ये निश्चित झालेल्या उपाययोजनांबाबतचा अहवालही गडकरी यांच्याकडे सादर करत याबाबत केंद्रीय स्तरावर तातडीने सूचना द्याव्यात, अशी मागणी केली,’ असे मोहोळ म्हणाले.  बैठकीत चर्चिले गेलेले मुद्दे – अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर ठोस चर्चा – एनएचएआयमार्फत रस्त्याची रचना. – खेड-शिवापुर टोल नाक्यावर वाहनांचा लोड तपासणे – टोल नाक्यावर आरटीओ मार्फत वाहनांची यांत्रिक तपासणी. – वेगमर्यादेवर नियंत्रण आणणे. – बॅरिकेडिंग व सिग्नल यंत्रणेत सुधारणा. – धोकादायक ठिकाणांची पुनर्रचना. – ठरावीक अंतरावर रम्बलर स्ट्रीप्सची संख्या वाढवणे – सर्व यंत्रणांमधील समन्वय वाढविणे.
“नवले पूल येथील अपघात थांबावेत, यासाठी मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेत या संदर्भातील बैठकांचा अहवाल सादर केला. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.”
मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी विमान वाहतूक

प्रभाग ३९ मध्ये वर्षा साठे आणि भीमराव साठे यांच्या विकास कामांचा वेग वाढला; जनसंपर्क कार्यालय उद्घाटनामुळे राजकीय समीकरणेही बदलणार

Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ३९ मध्ये गेल्या काही वर्षांत नगरसेविका वर्षा साठे आणि भाजप नेते भीमराव साठे यांनी केलेल्या विकासकामांचा मोठा बोलबाला आहे. रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, अंगणवाडी सुविधा, नागरिक उपक्रम अशा विविध स्तरांवर साठे दाम्पत्याने घेतलेल्या पुढाकारामुळे स्थानिकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. आता नव्याने उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले. या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागातील कामांना अधिक गती मिळणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात दिसत आहेत. नवीन कार्यालय हे फक्त जनसंपर्क केंद्र नसून, नागरिकांच्या समस्या वेगाने मार्गी लावण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा म्हणून पाहिले जात आहे. प्रभागात वाढलेल्या लोकसंख्येनुसार दैनंदिन नागरी अडचणी—पाणी, ड्रेनेज, वीज, आरोग्य सेवा, कचरा व्यवस्थापन—यांसंदर्भात नागरिकांना एक निश्चित, उपलब्ध आणि उत्तरदायी केंद्र मिळणे ही मोठी गरज होती. या कार्यालयाच्या माध्यमातून तक्रारींचे नोंदणी, फॉलो-अप तसेच थेट संपर्क अशा सुविधा अधिक सुलभ होतील. या सोबतच, निवडणुकीचा वातावरण हळूहळू तापू लागलेल्या काळात हे कार्यालय राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. साठे दाम्पत्याने विकासकामांवर लक्ष केंद्रित ठेवून जनमत मजबूत करण्याची रणनीती स्वीकारल्याचे दिसते. भाजपच्या स्थानिक संघटनांमध्येही या कार्यालयामुळे कार्यकर्त्यांना एक मध्यवर्ती मंच मिळाल्याने आगामी निवडणूक व्यवस्थापन अधिक गतिमान होणार आहे. प्रभाग ३९ मधील नागरी विकासाच्या संदर्भात साठे यांच्या कारभाराची तुलना इतर प्रभागांशी केली जात असून, विरोधकांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते. नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांना तत्परतेने प्रतिसाद देत त्यांच्या अपेक्षांवर उतरू शकल्यास, साठे दाम्पत्याची राजकीय पकड आणखी मजबूत होईल, असा सर्वसामान्यांचा अंदाज आहे.
“नगरसेविका म्हणून काम करताना मी प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी काहीतरी सकारात्मक घडवू शकेन याचा प्रयत्न केला. युवक-युवतींसाठी रोजगाराच्या दारात वाढ व्हावी यासाठी अप्पर भागातील‘लाईट हाऊस’ प्रकल्पात अनेकांना संधी दिली. प्रभागातील रस्ते, लाईट्स, पाणी अशा अनेक कामांचा सातत्याने पाठपुरावा केला. पुढेही हीच काम करण्याची ऊर्जा आणि प्रामाणिकता कायम ठेवून प्रभागाचा विकास माझ्या कामाच्या केंद्रस्थानी असेल.”
वर्षा साठे, माजी नगरसेविका
“सतरा वर्षे भाजपमध्ये कार्यरत राहून मी प्रभागासाठी अनेक विकास उपक्रम हाती घेतले. विशेषतः कोरोनाच्या काळात गरजू नागरिकांना मदत करण्यावर भर दिला. प्रभागात गोरगरीब आणि झोपडपट्टीतील नागरिकांची संख्या मोठी आहे; त्यांना शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचवणे हा माझा मुख्य उद्देश राहिला. आगामी काळातही प्रभागाचा सर्वस्तरीय विकास आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे प्राधान्य राहील.”
भीमराव साठे भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष

कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

0
Newsworldmarathi Pune: कारगिल युद्धात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्वोच्च अशा परमवीर चक्र सन्मानाने गौरविण्यात आलेले कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या हस्ते गणरायाची आरती देखील झाली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने परमवीर चक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांचे स्वागत व यशोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, मंगेश सूर्यवंशी, रोहित लोंढे, यांसह संजय भोसले, किशोर येनपुरे आदी उपस्थित होते. कॅप्टन योगेंद्र सिंह यादव म्हणाले, ‘दगडूशेठ’ हे असे गणपती बाप्पा आहेत, जे भक्ताच्या नावाने ओळखले जातात. देवतांमध्ये गणेशाचे स्थान सर्वोच्च असून करुणा, रिद्धी, सिद्धी, ज्ञानाचे ते प्रतीक आहेत. वेगळ्या प्रकारची शांती दगडूशेठ मंदिरात मिळते. गणपती बाप्पाने जे ज्ञान दिले आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविता येईल, असा माझा प्रयत्न आहे. पर्यावरणासह मानवतेला नवी चेतना देणारा दगडूशेठ गणपती ट्रस्ट आहे. भारतवासीयांवर गणेशाची कृपा सदैव राहो आणि सर्वत्र सुख शांती नांदो, अशी प्रार्थना त्यांनी गणेश चरणी केली.