Newsworldmarathi Pune: सानेगुरुजी प्राथमिक शाळा, सिंहगड रोड येथे बालदिन उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा होणाऱ्या या दिवसाची सुरूवात मुलांना विविध प्राण्यांचे मुखवटे देऊन झाली. कुणी हत्ती, कुणी सिंह, कुणी मांजर तर कुणी ससा बनून मुलांनी खेळाच्या मैदानात धाव घेतली. मिकी माऊस, पाळणा आणि विविध खेळण्यांमुळे शाळेचे वातावरण उत्साहाने भरून गेले.
यानंतर झालेल्या गोष्टीच्या तासात जादूगार संजय रघुवीर यांचे जादू प्रयोग पाहून मुले थक्क झाली. हे प्रयोग चमत्कार नसून हातचलाखी व वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्याचे त्यांनी मुलांना समजावून सांगितले. खेळ-धम्माल संपल्यावर विद्यार्थ्यांनी खाऊचा आस्वाद घेतला.
Oplus_16908288
बालदिनाच्या औपचारिक उद्घाटनासाठी मैदानात सर्व विद्यार्थी जमले. संस्थेचे सचिव मा. शिवाजी खांडेकर, संतोष पवार, तुषार मानकर, अतुल पासलकर, मनोज पोळेकर, नितीन मोरे, सूरज ननावरे आणि माजी विद्यार्थी प्रशांत सकट यांच्या उपस्थितीत फुगे आकाशात सोडण्यात आले. माजी विद्यार्थी म्हणून या पाहुण्यांनी शाळेबद्दलची जिव्हाळ्याची भावना व्यक्त केली.
२००४–०५ च्या चौथीतील माजी विद्यार्थ्यांच्या गटाने सर्व मुलांसाठी रायटिंग पॅड व खाऊचे वितरण केले. या पॅडचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या मित्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ (स्व. अजिंक्य नारायण खाटपे) देण्यात आले होते.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापिका काटे मॅडम यांनी केले. नगरसेविका प्रियाताई गदादे यांनी शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन बंदावणे सरांनी केले. नियोजनात ससे सर, खेडकर मॅडम आणि सांस्कृतिक प्रमुख गोवळकर मॅडम यांनी कार्यभार सांभाळला.
Newsworldmarathi Pune:निवडणुकांचा हंगाम सुरू झाला की पुण्यातलं वातावरण तर आपोआपच तापतं. नगरपालिका–नगरपंचायतींच्या अर्जाची मुदत संपली, त्यात PMC च्या आरक्षण सोडतीनं तर पुणेकरांचं राजकारण आणखी पेटवलंय. कोण कुठून उभं राहणार, कोण कुणाला चॅलेंज देणार… प्रभागांत वाऱ्यापेक्षा वेगानं चर्चा सुरू आहेत.
अशात सगळ्याचं लक्ष वेधून घेतोय एकच नाव हेमंत बागुल यांनी. ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांचे सुपुत्र हेमंत बागुल यांची सध्या सोशल मीडियावर पोस्टर्सचं तुफान सुरू आहे. “हेमंत बागुल प्रभाग २७ नवी पेठ–पर्वती या प्रभागातून इच्छुक आहेत. हेमंत बागुल सध्या सोशल मिडियावर पोस्टरबाजी करताना दिसत आहेत. मात्र या पोस्टर वर कोणत्याही पक्षाचे चिन्ह नाही. हा प्रभाग म्हणजे भाजपचा जणू बालेकिल्ला. आता हेमंत बागुल यांचा अजून पक्ष निश्चित नाही त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून उभे राहणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.
आबा बागुल यांनी सहा टर्म काँग्रेसच्या नगरसेवक म्हणून धुमाकूळ घातला होता. नंतर अपक्ष लढले, त्यानंतर कोणत्याही पक्षात गेले नाहीत. पण अलीकडच्या नवरात्री महोत्सवाला चंद्रशेखर बावनकुळे आणि माधुरी मिसाळ हजर होते त्यामुळे हेमंत बागुल भाजप कडून लढणार का असेही चर्चा आहे.
“प्रभाग २७ मधल्या लोकांशी माझं नातं खूप जुने आहे. कोणत्या पक्षातून लढायचं, हे मित्र–कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ठरवेन. पण निर्णय एकच — प्रभागाचा विकास!”
प्रभाग क्रमांक ४० मधील काकडे वस्ती ते ह.भ.प. पुंडलिक दादा टिळेकर चौक या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. २३ कोटी रुपयांच्या वा प्रकल्पामुळे कोंढवा परिसराचा चेहरामोहराच बदलणार आहे.
कार्यक्रमात बोलताना आमदार योगेश टिळेकर यांनी प्रभागातील सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली. “देशात-राज्यात भाजपचे सरकार आणि महानगरपालिकेतही भाजपची सत्ता असल्यासच विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकते, असे सांगत येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्याउमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन
मी त्यांनी केले.
टिळेकर यांनी पुढील काळात आणखी अनेक कामे प्राधान्याने
पूर्ण करण्याचे आश्वासनही दिले. आपल्या मनोगतामध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, “योगेश टिळेकर यांच्यासारख्या कार्यक्षम व्यक्तीला विधान परिषद सदस्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत योग्य निर्णय घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळेच राज्य शासनाचा मोठा निधी या भागाला मिळाला आहे.” त्या पुढे म्हणाल्या की कात्रज-कोंढवा रोड लवकरच पूर्ण होत असून बाधितांना रोख मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने हा रस्ता नागरिकांसाठी लवकरच खुला होईल.
या कार्यक्रमाला माजी नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम, राणी भोसले, चीरसेन जगताप, वृषाली कामठे, राजाभाऊ कदम, सुनील कामठे, रायबा भोसले, चेतन टिळेकर, करण मिसाळ, अभिजीत शहा यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Newaworldmarathi Pune: भवानी पेठेत क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. सालाबादप्रमाणे यंदाही आध्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान आणि मातंग एकता आंदोलन, पुणे शहर यांच्या वतीने जयंतीपूर्व संध्येला दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. परिसरात दीपमाळा उजळून निघाल्याने वातावरणात भक्तीभाव आणि ऐतिहासिक परंपरेची अनुभूती निर्माण झाली.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांनी लहुजी वस्तादांच्या कर्तृत्वाची आणि सामाजिक परिवर्तनातील भूमिकेची आठवण करून देत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे इंदिराताई बागवे, विठ्ठल थोरात (समन्वय – महाराष्ट्र राज्य), अरुण गायकवाड (सेक्रेटरी – महाराष्ट्र राज्य), यासेर बागवे (युवा नेते), राजश्री अडसूळ (अध्यक्षा, पुणे शहर),अनिल हातागळे (अध्यक्ष, लहुजी समता परिषद), रवीअप्पा पाटोळे (स्वीकृत सदस्य) यांसह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच जेथे फाउंडेशनचे मा. कान्होजी जेधे, मा. नाना करपे (काँग्रेस), मा. जुबेर दिल्लीवाले, गोविंद जाधव, हुसेन शेख, सुनील साळवे, जयदीप शेलार, कुमार आडगळे, राहुल चिदम आदी मान्यवरांनी उपस्थित राहून दीपोत्सवाला मंगलमय शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या माध्यमातून लहुजी वस्तादांच्या शौर्यपरंपरेला, सामाजिक समतेच्या मूल्यांना आणि क्रांतीशील विचारांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विविध मान्यवरांच्या उपस्थितीने व परिसरातील नागरिकांच्या सहभागाने जयंती उत्सव अधिक भव्य आणि यशस्वी ठरला.
Newsworldmarathi pune: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागताच पक्षांमध्ये संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेण्याची गरज अधिक अधोरेखित झाली असून, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता यासाठी कटिबद्ध आहे. साठे दाम्पत्यांनी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयातून सेवा अधिक वेगाने होतील असा वविश्वास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
बिबवेवाडी अप्पर डेपो परिसरातील भाजप अनुसूचित जाती मोर्चा पुणे शहराध्यक्ष भीमराव साठे आणि माजी नगरसेविका वर्षा साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी साठे दाम्पत्याच्या कामाचे दोन्ही मंत्र्यांनी कौतुक केले.
Oplus_16908288
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, “भाजपचा कार्यकर्ता हा तळातून तयार झालेला असतो. वर्षा साठे आणि भीमराव साठे यांचे काम आम्ही जवळून पाहिले आहे. अनुभवी आणि जनतेशी सातत्याने जोडलेला कार्यकर्ता कसा असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भीमराव साठे.” त्यांच्या कार्यातून सेवा, संघटन आणि नेतृत्वगुण स्पष्टपणे दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, “साठे दाम्पत्याने गेल्या दहा-बारा वर्षांत नगरसेवक नसतानादेखील अतिशय नियोजनबद्ध आणि उत्कृष्ट काम केले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व सर्वसामान्यांसाठी घेतलेले परिश्रम लक्षणीय आहेत. पुढील दोन महिन्यांत त्यांच्या कार्याची फलश्रुती आणि या कार्यालयासमोर मोठी उत्सुकता पाहायला मिळेल, याबद्दल मला विश्वास आहे.” नवीन कार्यालयातून गोरगरिबांच्या तातडीच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक तत्पर राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला भाजप राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य बाबाशेठ मिसाळ, आमदार सुनील कांबळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, रंजना टिळेकर, युवा मोर्चा अध्यक्ष करण मिसाळ, माजी नगरसेवक दिनेश धाडवे, रूपाली धाडवे, आनंद रिठे,, महेश वाबळे, बाळा ओसवाल, रघु गौडा, वीरसेन जगताप, राजेंद्र शिळीमकर, वृषाली कामठे, संगीता ठोसर, मनीषा कदम, गणेश मोहिते, अविनाश खेडेकर, स्वामीभक्त दिनकर उर्फ बाळा कसबे आदी उपस्थित होते.
Newsworldmarathi Pune: राज्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस या भागात कडक थंडीचा इशारा दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात तापमान घसरत असून नागरिकांना बोचऱ्या गारठ्याचा अनुभव येत आहे.
शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमान जळगाव येथे ८.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. पुण्यातील किमान तापमान ११.२ अंशांवर स्थिरावले. दिवसा थंडगार हवा आणि सायंकाळनंतर बोचरी थंडी या दुहेरी परिणामामुळे अनेक भागात शेकोट्यांचा आधार घेतला जात असून उबदार कपड्यांची खरेदीही वाढली आहे.
दरम्यान, कोकण पट्टा वगळता सर्वत्र थंडीचा कडाका कायम आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात लक्षणीय घसरण झाली असून अनेक भागात तापमान १० ते १२ अंशांच्या आसपास नोंदवले जात आहे. देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतही थंडीची लाट कायम आहे. राजस्थानमधील सिकर येथे सर्वात कमी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
⸻
शनिवारी दणक्यात गारठलेले जिल्हे
• जळगाव : ८.७°
• अहिल्यानगर : ९.६५°
• बीड : १०.५°
• गोंदिया : १०.६°
• यवतमाळ : १०.८°
• पुणे : ११.२°
• मालेगाव : ११.२°
• वाशिम : ११.६°
• परभणी : ११.७°
• अमरावती : १२.७°
• सातारा : १२°
• महाबळेश्वर : १२°
• छ. संभाजीनगर : १२.६°
Newaworldmarathi Pune : चिंतामणी ज्ञानपीठ, पुणे महानगरपालिका आणि अप्पा रेणुसे मित्रपरिवार यांच्या सहकायनि चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा रस्ता दत्तक घेण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या चांगल्या कामाला जेव्हा अजित पवार यांच्यासारख्या जाणकारांची कौतुकाची थाप मिळते तेव्हा त्या सगळ्या प्रयत्नांचे खऱ्या अथनि सार्थक होते.
पुण्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे याचे समाधान मोठे आहे. या रस्त्याचे पूर्वीचे स्वरूप पाहिलेले दक्षिण पुण्यातील नागरिक हे नवे बदल अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पी. पृथ्वीराज, ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता पथ अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त विजय थोरात, प्रसाद काटकर, माधव जगताप, सहायक आयुक्त सुरेखा भणगे, दत्ता धनकवडे, सुभाष जगताप, अभय मांढरे व परिसरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
स्मार्ट सिटीच्या स्वप्नाला बळ देणारे हे पाऊल आहे. जर आपण ठरवले तर काय घडू शकते याचा वस्तुपाठ या योजनेच्या शुभारंभातून दिसतो आहे. विकासकामात नागरिकांनी असाच सहभाग दाखवायला हवा. एका बाजूला विकासाचे सार्वत्रिक प्रयत्नशासनस्तरावर सुरू असताना समाजाचा घटक म्हणून आपली जबाबदारीसुद्धा मोठी आहे. पुणे शहरातील या पथदर्शी प्रकल्पाचे इतरांनीही अनुकरण करायला हवे. अनेक रस्ते अशा रीतीने दत्तक पेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि नागरिकांनी सजगता आणि सुजाणता दाखवायला हवी, असे मत अजित पवार यांनी या वेळी व्यक्त केले. अप्पा रेणुसे मित्रपरिवारातील सर्व जण या वेळी उपस्थित होते.
Newsworldmarathi Pune: मुंबई–बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील गंभीर अपघातांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राबवलेल्या उपाययोजनांचा कुचकामीपणा पुन्हा एकदा उघड झाला असून, या उपाययोजनांवर झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केला आहे. महामार्गावरील वाढत्या दुर्घटनांसाठी जबाबदार कोण आणि राबवलेल्या उपाययोजना अयशस्वी का ठरत आहेत, याची चौकशी केंद्र सरकारने तातडीने करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
पाटील यांनी सांगितले की, नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या मार्गावर अपघात रोखण्यासाठी वेगमर्यादा ताशी ६० वरून ४० किमीपर्यंत कमी करण्यासह वाहतूक तपासणी चौकी, मानवीबल तैनाती, गस्त वाहने आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात या चौक्यांवर मनुष्यबळ नसणे, अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि महामार्गावर कोणती ही शिस्तबद्ध देखरेख नसल्यामुळे उपाययोजना कागदोपत्रीच राहिल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
NHAI कडून उपाययोजनांनंतर अपघातांची संख्या ६४ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा करण्यात आला होता; परंतु प्रत्यक्षात अपघात थांबलेले नाहीत, हे गुरुवारी झालेल्या दुर्घटनेवरून सिद्ध होते, असे पाटील म्हणाले. महामार्गावरील निष्काळजीपणा, अपुरे पथ सुरक्षा उपाय आणि ढिसाळ अंमलबजावणीमुळे जनजीवन धोक्यात येत असून, या परिस्थितीची गंभीर दखल घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Newsworldmaratahi pune: 9 नोव्हेंबर 2011 रोजी 2002 आणि 2004 च्या शैक्षणिक वर्षातील अकरावी व बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्राचार्य अनिल कांबळे, पर्यवेक्षक जीवन इंगळे, शाळा समिती अध्यक्ष तुषार शिंदे, तसेच सेवाजेष्ठ निवृत्त शिक्षक चंद्रकांत गोले, बाळकृष्ण माडगूळकर, बाळाराम धुलप, मानसिंग गायकवाड, पुष्पक कांदळकर आणि माजी विद्यार्थी दलप्रमुख अविनाश खंदारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गखोलीत जाऊन तेथील आठवणी ताज्या केल्या. विद्यार्थीदशेतील अनुभवांवर मनमोकळा संवाद साधताना अनेकांनी आपल्या शिक्षकांची भेट घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या प्रगतीची माहिती जाणून घेतली.
प्राचार्य अनिल कांबळे आणि पर्यवेक्षक जीवन इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जुन्या शाळेशी जोडलेला भावनिक आणि शैक्षणिक बंध अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.
स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी योगेश रसाळ, राकेश गुंड, राजेश माने, विकास राऊत, विजय दिंडले, अश्विनी कासार, सारिका अडसूळ, धनश्री आढाव आणि पूजा कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
उत्साह, आठवणी आणि मैत्रीने भरलेल्या या स्नेहमेळाव्याने सर्वांच्या मनात पुन्हा एकदा विद्यार्थी जीवनाचा सुवर्णकाळ उजळला.
Newsworldmarathi Pune नवले पूल परिसरात गुरुवारी रात्री झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. अल्पकालीन उपाययोजनांसंदर्भात उद्या (शनिवारी) संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेतली जाईल. तसेच नऱ्हे ते रावेत व्हाया सुतारवाडी या उन्नत मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) मंजूर झाला असून त्याला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल,’अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.
नवले पूल येथे गुरुवारी झालेल्या अपघातानंतर शुक्रवारी सकाळी मोहोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले, ‘२०२२ मध्ये येथे मोठा अपघात झाला होता. त्यानंतर जांभूळवाडी ते वडगावपर्यंत सातत्याने होणारे अपघात थांबविण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यातील रम्बलर्सची संख्या वाढवणे, स्पीड गन्स वाढवणे, पंक्चर्स बंद करणे यासारख्या काही अल्पकालीन उपाययोजना अमलातही आणल्या गेल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षात अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, गुरुवारच्या दुर्दैवी अपघातात आठ जणांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे कायमस्वरूपीच्या उपाययोजनांना गती देणे आवश्यक आहे,’.
‘मागील अपघातानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत पुण्यात तसेच दिल्लीतही बैठक झाली होती. त्यात जांभूळवाडी ते सुतारवाडी व सुतारवाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीच्या व सुमारे सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा ‘डीपीआर’ही मंजूर झाला आहे. त्यामुळे येथील अपघात थांबविण्यासाठीच्या या दीर्घकालीन उपाययोजनेला गती देण्यासंदर्भात गडकरीजींची भेट घेऊन पाठपुरावा केला जाईल, असे मोहोळ यांनी नमूद केले.
‘अल्पकालीन उपाययोजनांमध्ये या मार्गावरून येणाऱ्या ट्रक्सची खेड शिवापूर टोल नाक्याजवळच लोड व ब्रेक तपासणी करणे, स्पीड गन्स वाढवून कारवाई करणे, रम्बलर्स वाढवणे आणि सेवा रस्ते पूर्ण क्षमतेने विकसित करणे आदींचा समावेश आहे. तसेच अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने पुढे पाठवता येण्याविषयी चाचपणी केली जाईल. यासंदर्भात पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन आणि पीएमआरडीए या सर्व घटकांची एकत्रित बैठक शनिवारी घेण्यात येईल. या सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यास कारवाई केली जाईल, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.