Newsworldmarathi Navi Delhi: देशातील आघाडीची कृषितंत्रज्ञान कंपनी शॉप्शन प्रा. लि.ला अॅग्रिकल्चर टुडे कॉन्क्लेव्ह २०२६मध्ये प्रतिष्ठेचा ‘स्टार्टअप लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शरद आर. काळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या सोहळ्यास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, गुजरातचे कृषिमंत्री राघवजी पटेल तसेच कृषी क्षेत्रातील धोरणकर्ते, तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भारतीय शेतीमध्ये तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांद्वारे परिवर्तन घडवून आणण्यासाठी शॉप्शनने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. कंपनीने शेतकरी, विक्रेते आणि कृषी उपकरण उत्पादक यांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणत शेतीसाठी आवश्यक उत्पादने आणि सेवा अधिक सुलभ केल्या आहेत. तसेच सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, आयओटी आणि डिजिटल कृषी उपायांवर कंपनी विशेष भर देत आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर शरद आर. काळे म्हणाले, “हा सन्मान आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा, विक्रेत्याचा आणि आमच्या संपूर्ण टीमचा आहे. ग्रामीण भारतातील शेती अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू.”
शॉप्शन सध्या देशातील २५ राज्यांमध्ये कार्यरत असून ५५ हजारांहून अधिक विक्रेत्यांचे जाळे कंपनीशी जोडलेले आहे. कंपनीच्या ‘जीबीआरयू’ या ब्रँडअंतर्गत सिंचन, पंप, पाइप, हार्वेस्टर, स्प्रे पंप, रोटाव्हेटर, अर्थ ऑगर आदी ३५० हून अधिक कृषी उत्पादने उपलब्ध आहेत. डिजिटल व्यवहार आणि अल्पावधीत कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यामुळे कंपनीने कृषी व्यवसायात नवे मॉडेल उभे केले आहे.


Recent Comments