Homeपुणेमंत्री चंद्रकांतदादांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

मंत्री चंद्रकांतदादांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Newsworldmartahi Pune : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा यांनी आज फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित इंडिया सायन्स फेस्टिव्हलमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांची शाळा घेतली. तसेच, विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली.

Advertisements

फाउंडेशन फॉर ॲडव्हान्सिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे (फास्ट इंडिया) ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी इंडिया सायन्स फेस्टिव्हलचे आयोजित करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात होत असलेल्या या महोत्सवात वैज्ञानिक प्रयोगांसह विविध उपक्रम सादर होणार असून, विज्ञान क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या महोत्सवात लोणावळा मधील कल्पना चावला स्पेस ॲकेडमीच्या विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. या अकाडमीमध्ये देशभरातून २५ विद्यार्थीचीच निवड झाली असून; या विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रात सुरु असलेल्या संशोधनाचे शिक्षण दिले जाते.

या विद्यार्थ्यांशी नामदार पाटील यांनी संवाद साधला. यावेळी युवराज गुप्ता या विद्यार्थ्यांला वर्षभरात घेतलेल्या शिक्षणाची माहिती घेतली.‌ त्यावर त्याने अतिशय आत्मविश्वासाने वर्षभरातील शिक्षणाची माहिती दिली. हे ऐकून समाधान व्यक्त करत,विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी फास्ट इंडियाचे सह-संस्थापक वरुण अग्रवाल, माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन, फास्ट इंडियाचे सीईओ शील कपूर, चेअरमन डेक्कन एज्युकेशनचे प्रमोद रावत आदी उपस्थित होते.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments