Newsworldmarathi Pune : डॉ.संतोषकुमार पांडुरंग मस्तुद,एम.डी.एस, ए सी आय, प्राध्यापक, सेंटर इन्चार्ज, डीपीयु डेंटल इम्प्लांट सेंटर, डॉ.डी वाय पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांना दासना फाउंडेशन ,दासना नॅशनल हेल्थ एक्सलन्सी अवॉर्ड 2024 यांच्यातर्फे ‘एक्सलन्स इन डेंटल इम्प्लांटोलॉजी’अवॉर्ड देण्यात आला.
दिल्ली येथे कॉन्स्टिट्यूशन क्लब हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे खासदार व सिने अभिनेता माननीय श्री. रवी किशन यांच्या हस्ते मान्यवराच्या उपस्थित देण्यात आला.
दंतक्षेत्रातील डेंटल इम्प्लांट सर्जरी या विभागातील केलेल्या उत्कृष्ट कामाचे व सामाजिक कामाचे योगदान म्हणून हा राष्ट्रीय पुरस्कार,दिल्ली येथे देण्यात आला. डॉ.संतोषकुमार यांना विविध राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील सर,प्र-कुलपती डॉ.भाग्यश्री पाटील, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार ,प्र-कुलगुरु डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील, कुलसचिव डॉ.जे.एस. भवाळकर, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.डी.गोपालाकृष्णनन आणि डॉ.परेश काळे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.