Newsworldmarathi Pune : इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे पुण्यातील AISSMS येथे ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या राष्ट्रीय पातळीवरील हॅकाथॉन स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे अयोजन येत्या 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी कऱण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करण्यात आली असून राज्यभरातील सर्व विद्यापीठातील तसेच सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.स्पर्धक विद्यार्थ्यांना सात विषय संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी दिले आहेत. या स्पर्धेत विजयी व सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण 7.5 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.त्यातील पहिले बक्षीस 2 लाख रुपयांचे, दुसरे बक्षीस 1 लाख रुपयांचे तर तिसरे बक्षीस 75 हजार रुपयांचे असणार आहे, इनोवेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली.
इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या राष्ट्रीय पातळीवरील हॅकाथॉन स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कल्पेश यादव बोलत होते. याप्रसंगी इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कल्पेश यादव म्हणाले, ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या स्पर्धेसाठी एआयएसएसएमएस- इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एआयसीटीई, राज्याचा तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयडीटीआरएस यांचे सहकार्य लाभले आहे.
शिक्षण आणि संशोधन हा देशाच्या विकासाचा पाया आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. इनोवेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेमधून समाजोपयोगी संशोधन निर्माण व्हावे. उद्योजकांना पूरक असणाऱ्या संशोधनाची निर्मिती व्हावी. समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी आवश्यक संशोधन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बाहेर यावे, विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिसर्च कल्चर निर्माण व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या राष्ट्रीय पातळीवरील हॅकाथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी innovateyou.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क 999 रुपये तर महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क 1,999 रुपये आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित स्पर्धक गटाने गूगल फॉर्म च्या माध्यमातून प्रॉब्लेम स्टेटमेंट सबमिट करावयाचे आहे. मागील वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत 39 शहरांमधील आणि 9 राज्यांमधील 600 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मागील वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुन्हा एकदा संशोधनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे, असेही कल्पेश यादव यांनी सांगितले.
*इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ स्पर्धेचे विषय*
1) एज्यूटेक
२) ट्राफिक मॅनेजमेंट
3) स्टुडन्ट इनोवेशन
4) एन्व्हायरमेंट
5) डिझास्टर मॅनेजमेंट
6) हेल्थ केअर
7) ॲग्रीकल्चर
स्पर्धेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात नमूद केलेली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रतन टाटा यांच्या स्मरणार्थ रतन टाटा इनोव्हेटिव्ह माईंड अवॉर्ड आणि बेस्ट इनोवेशन युजिंग अवॉर्ड दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे दहा हजार रुपये रक्कमेची 35 स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत.
नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना रजिष्ट्रेशन किट त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना innovateyou.in/hackathon या लिंकचा वापर करता येईल. नोंदणी करताना तांत्रिक अडचण निर्माण आल्यास विद्यार्थी 9689742929, 9623337777 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. त्यासाठी प्राचार्य आणि पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रदीप माने आणि संजय ससाणे यांनी केले आहे.