Newsworldmarathi Pune : तुमचा मूड वारंवार खराब होतो का? मूड गेल्याने तुम्हाला निरुत्साह किंवा चिडचिड जाणवते का? नवीन वर्षात तुम्हाला आपल्या मूडवर, भावनांवर ताबा मिळवून मूड मास्टर बनायचे असेल, जाणून बुजून मूड चांगला करायला शिकायचं असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
तेजज्ञान फाउंडेशनतर्फे 26 जानेवारी 2025 रोजी, दुपारी 1 ते 4 या वेळात मनन आश्रम, सिंहगड रोड, पुणे येथे तेजगुरू सरश्री यांचे ‘जानबूझकर मूड अच्छा कैसे करे?, Mood Mastery in 2025 हे मार्गदर्शक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संपूर्णपणे निःशुल्क असून सर्वांसाठी खुला आहे. याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब, फेसबुक आणि झूमच्या माध्यमातूनही केले जाणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि कायमस्वरूपी बदल घडवावा असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
तेजज्ञान फाउंडेशनची वेबसाईटवर https://happythoughts.global/26jan_live येथे रजिस्टर करून तुम्ही या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी 9921008060 या नंबरवर कॉल करा