Homeपुणेक्रेडाई पुणे मेट्रो तर्फे भव्य D2C महोत्सवाचे आयोजन

क्रेडाई पुणे मेट्रो तर्फे भव्य D2C महोत्सवाचे आयोजन

Newsworldmarathi Pune : क्रेडाई पुणे मेट्रो तर्फे चॅनेल पार्टनर्ससाठी भव्य D2C महोत्सवाचे आयोजन कृषी मैदान, पुणे येथे दिनांक १६ जानेवारी रोजी करण्यात आले. या भव्य सोहळ्याला पुणे शहरासह महाराष्ट्राच्या विविध भागांतील हजारो चॅनेल पार्टनर्सनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Advertisements

कार्यक्रमात पुणे शहराचे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि औद्योगिक महत्त्व दर्शवणारा एक विशेष लघुपट प्रदर्शित करण्यात आला. या लघुपटातून पुणे हे केवळ राहण्यासाठी नव्हे, तर गुंतवणूक आणि व्यवसायासाठीही आदर्श शहर का आहे, हे प्रभावीपणे मांडण्यात आले.

क्रेडाई पुणे मेट्रोचे माजी अध्यक्ष श्री. सतीश मगार यांनी पुण्याच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, आयटी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य स्थानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पुण्याच्या आल्हाददायक हवामानाचा उल्लेख करत, हे शहर राहण्यासाठी सर्वोत्तम असल्याचे सांगितले.

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर मयंक अग्रवाल आणि सौदागर यांनीही पुण्याच्या वाढत्या लोकप्रियतेचे कौतुक केले.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्री. रणजित नाईकनवरे यांनी विकसक आणि चॅनेल पार्टनर्स यांच्यातील सहकार्य आणि परस्पर विश्वास यावर भर दिला.

या भव्य सोहळ्याचे उद्घाटन प्रॉप (Professional Realtors of Pune) चे अध्यक्ष श्री. दर्शन चावला यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन D2C कार्यक्रमाचे संयोजक श्री. पुनित ओसवाल यांनी केले, याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

हा D2C महोत्सव चॅनेल पार्टनर्ससाठी प्रेरणादायी ठरला असून, व्यावसायिक संबंध दृढ करण्यास आणि पुणे शहराच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारा आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments