Homeपुणेसाने गुरुजी प्राथमिक शाळेत 'सन्मान मातृत्वाचा' सन्मान सोहळा संपन्न

साने गुरुजी प्राथमिक शाळेत ‘सन्मान मातृत्वाचा’ सन्मान सोहळा संपन्न

Newsworldmarathi Pune: महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक शाळेत सन्मान मातृत्वाचा, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार व गुणवंत पालक पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यशाच्या शिखरावर असणारे माजी विद्यार्थी शोधून त्यांच्या यशात आईचे योगदान अनन्यसाधारण असते हा गाभा पकडून यशस्वी विद्यार्थ्यांच्या मातांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

वर्षभर सातत्यपूर्ण निरीक्षणातून प्रत्येक वर्गातून एक गुणवंत विद्यार्थी निवडला गेला.त्यात त्या विद्यार्थ्याची वाचन क्षमता, नियमितता, टापटिपता, शिक्षकांशी संवाद, हस्ताक्षर,नम्रता इत्यादी निकषांच्या आधारे निवड करण्यात आली.तसेच गुणवंत पालक पुरस्कारासाठी पालकांचा शाळेसोबतचा संवाद व सहभाग, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती या निकषांवर आधारित वर्षभरातील निरिक्षण व नोंदीअधारे निवड करण्यात आली. यात प्रत्येक निकषासाठी स्टार देण्यात आले होते.

सर्वात जास्त स्टार मिळवणारे पालक व विद्यार्थी निवडले गेले.
हे सर्व पुरस्कार मुख्याध्यापिका मीना काटे मॅडम यांनी त्यांच्या सासू स्व.कलावती बाळकृष्ण काटे यांच्या स्मरणार्थ दिले. आकर्षक स्मृतिचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योगगुरू संगिता कळमकर उपस्थित होत्या.अध्यक्षस्थान संस्थेच्या संचालिका मा.अलकाताई काळे उपस्थित होत्या. व्यासपीठावर शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव मा .शिवाजी खांडेकर , मुख्याध्यापिका मीना काटे तसेच सेवाज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे उपस्थित होते.
सन्मान मातृत्वाचा पुरस्कार स्वीकारताना माजी विद्यार्थी व त्यांच्या मातांचे मन हेलावून गेल्याचे दृष्य दिसून आले. खळखळत्या आनंद आश्रूंनी हा पुरस्कार सर्वांनी स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे संगिता कळमकर, निलेश पायगुडे, सुषमा घरबुडवे, व अध्यक्षा अलकाताई काळे यांनी आपले विचार मांडले.

स्वच्छतेची सवय लागावी या उद्देशाने जे विद्यार्थी वर्ग स्वच्छतेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात अशा ४५ विद्यार्थ्यांना ” स्वच्छतेचा राजा ” पारितोषिक मुख्याध्यापिका सौ मीना काटे यांच्या वतीने देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, विठ्ठल शेवते, तेजस्विनी फुलफगर, लक्ष्मी कांबळे, मोनिका पोटे, शितल रुपनूर यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन संगिता गोवळकर यांनी, प्रास्ताविक मीना काटे यांनी तर आभार शितल खेडकर यांनी मानले.

सन्मान मातृत्वाचा पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थी पुढीलप्रमाणे-
१) अनुष्का लक्ष्मी बाळू कांबळे
२) अमित मंगल अरविंद जाधव
३) सोनाली मंगल बापू खुरंगळे
४) भाग्यश्री बेबी मल्हारी जाधव
५) आलम शकिला जमील शेख
६) निलेश शांताबाई ज्ञानदेव पायगुडे

गुणवंत पालक पुरस्कार प्राप्त नावे पुढीलप्रमाणे-
सौ. अनिता नरेंद्र हांजे
सौ. जान्हवी सूर्यकांत खुलम
सुषमा समीर घरबुडवे
सचिन बाळासो दारवटकर
मिनाक्षी महेश ननावरे
सौ जगदेवी दत्तात्रय लिंगशेटटी

गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
विहान धनराज कदम
कु. रिया सूर्यकांत खुलम
ईशा समीर घरबुडवे
अद्विका दिलीप पालके
सिद्धांत महेश ननावरे
मनस्वी अरविंद शेंडगे

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments