Homeभारतहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर

पुणे : शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रशासकीय बैठकीत १६ विकासप्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये पीएमआरडीएमार्फत उभारण्यात येत असलेल्या Pune Metropolitan Region Development Authority च्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम ९४ टक्के पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. एप्रिलअखेर २३ पैकी १३ स्थानके पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यानंतर चाचण्या घेऊन लवकरच मार्ग सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत नदीसुधार आणि पुनर्जीवन कामांना वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या. समान पाणीपुरवठा योजनेतील उर्वरित साठवणूक टाक्या, जलवाहिन्या व मीटर बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविणे आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यावरही भर देण्यात आला.

चांदणी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, गदिमा स्मारक व लहुजी वस्ताद स्मारक आदी कामांना गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. वनाज-चांदणी चौक व रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गांसह विमानतळ मेट्रो कनेक्टिव्हिटीसाठी सहा पर्यायांवर चर्चा होऊन व्यवहार्य मार्ग निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. खडकवासला-हिंजवडी मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून विमानतळ परिसरातील रस्ते विस्तार आणि सौंदर्यीकरणालाही लवकरच सुरुवात होणार आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments