Newsworld New Delhi : भारताची फुलराणी म्हणून जगविख्यात असलेली बॅडमिंटन (Badminton) खेळाडू पी.व्ही. सिंधू (P. V. Sindhu) आता बोहल्यावर चढणार आहे. सिंधूने लग्न करण्याचा निर्णय घेतला असून २२ डिसेंबरला उदयपूर येथे हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. सिंधूचे लग्न हे वेकंट दत्ता साई यांच्याशी होणार आहे.
वेकंट दत्ता साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजिसमध्ये कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी वेंकट दत्ता साई यांचे नाव प्रकाशझोतात आले नव्हते. पण सिंधूच्या कुटुंबियांशी त्यांचे बऱ्याच वर्षांपासूनचे संबंध आहेत. त्यामुळे पीव्ही सिंधू आणि वेंकट दत्ता साई हे एकमेकांना बऱ्या वर्षांपासून ओळखत असावेत, असे म्हटले जात आहे. २२ डिसेंबरला आता सिंधूचा विवाह सोहळा उदयपूर येथे होणार आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २४ डिसेंबरला सिंधूच्या लग्नाचे रिसेप्शन हे हैदराबाद येथे होणार आहे