Newsworld Pune : सोमवारी (दि. २) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास योगेश नेरकर हा युवक कामावरून घरी येत असताना त्याला खाणेवाडी येथे डांबरी रस्त्यावर बिबट्या दिसला. त्याने ही माहिती शरद नेहरकर यांना दिली. शरद नेहरकर यांनीही तातडीने आजूबाजूच्या लोकांना फोन करून बिबट्या आल्याची खबर दिली, तसेच योगेश नेहरकर यांना घरी नेण्यासाठी चार चाकी गाडी पाठवून त्याला घरी नेले. त्यानंतर हा बिबट्या शरद नेहरकर यांच्या घराजवळ आला. बिबट्याने आपला मोर्चा उसाच्या कडेला लावलेल्या पिंजऱ्याकडे वळवला. बिबट्याला भक्ष म्हणून बकरी ठेवण्यात आले होती.
या बकरीच्या शिकारीच्या आशेने बिबट्या पिंजऱ्यात गेला आणि अडकला. पिंजऱ्याचा मोठा आवाज झाल्यावर शरद नेहरकर यांनी तात्काळ वन विभागाला ही माहिती दिली. वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी येऊन त्यांनी बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलवले. . दोन दिवस हा बिबट्या पिंजऱ्याच्या आजूबाजूला येऊन जायचा, परंतु पिंजऱ्यामध्ये येत नव्हता. स्थानिक नागरिकांनी वनविभागाला या पिंजऱ्या बिबट्याला भक्ष म्हणून बकरी ठेवण्याची सूचना केल्यानंतर वनविभागाने त्या पिंजऱ्यात बिबट्याला खाद्य म्हणून बकरी ठेवल्याने सोमवारी (दि. २) रात्री साडेअकरा वाजता हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला.या बिबट्याला वन विभागाने माणिकडोह येथील निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आले असल्याचे वनक्षेत्रपाल लहू ठोकळ यांनी सांगितले.