Newsworld Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आज ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहणार आहेत. गुजरातमधील गोध्रा कांडावर आधारित हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही खूप प्रशंसा मिळाली आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे.
चित्रपटात अभिनेता विक्रांत मस्सी मुख्य भूमिकेत आहे. गुजरातमधील गोध्रा घटनेचे विविध पैलू दाखवणाऱ्या या चित्रपटाचे अनेक राज्यांमध्ये करमुक्त (टॅक्स फ्री) प्रदर्शन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनीही चित्रपटाचे कौतुक केले. आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हा चित्रपट पाहणार आहेत. चित्रपट दिल्लीच्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये ते आज चित्रपट पाहतील.