Homeपुणेकोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत स्वच्छता अभियान

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत स्वच्छता अभियान

Newsworldmarathi Pune : मा.उप आयुक्त , परिमंडळ क्र. ४ व मा. उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका यांचे माध्यमातून ब्रँड ॲम्बेसिडर विक्रांत सिंह यांच्या उपस्थितीत कोंढावा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत ऐतिहासिक पेशवे तलाव,VIT कॉलेज या परिसरात स्वच्छता अभियान रबविण्यात आले.

या अभियानात बिबवेवडी येथील ९० पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच क्षेत्रिय कार्यालय अधिकारी कर्मचारी, स्थानिक नागरीक यांनी सहभाग घेतला. यावेळी परीसर स्वछ करुन १६१५ किलो कचरा गोळा करण्यात आला.

स्वच्छता अभियान दरम्यान नागरिकांमध्ये उघड्यावर्ती कचरा न टाकने, प्लास्टिक वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इत्यादी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

याप्रसंगी मा.महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी मार्गदर्शन करुन स्वच्छतेविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी कोंढवा येवलेवडी व धनकवडी क्षेत्रिय कार्यालय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments