Newsworldmarathi Pune : पुणे जिल्ह्यातून राजकारणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी माजी खासदाराच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे नेमकं कारण अजून समोर आलं नाही. मंचर येथील माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांचे चिरंजीव विकास बाणखेले यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मंचर पोलिसांनी रामदास बाणखेले यांच्या फिर्यादीनुसार विकास बाणखेले यांनी आत्महत्या केल्याचा गुन्हा पोलिस हवालदार तानाजी हगवणे यांनी दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सुमित मोरे करत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
याबाबत माहिती अशी की, विकास किसनराव बाणखेले सकाळी गावात आले होते, छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांबरोबर गप्पा मारून ते घरी गेले. तेव्हा सगळं काही ठीक होतं. नंतर ते जेवणासाठी साडेअकरा वाजता आले नसल्याने त्यांचे बंधू बँकेचे संचालक रामदास बाणखेले यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला.
नंतर मात्र आवाजाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले असता विकास यांनी एका वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचलले याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.
घटनास्थळी मंचर पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येबाबत कोणते आर्थिक किंवा इतर कारण होते का? असा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने मात्र एकच धक्का अनेकांना बसला आहे.