Homeक्राईमइमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकलेल्या तरुणाची सुटका

इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकलेल्या तरुणाची सुटका

Newsworld Pune : सकाळी ०७•०९ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात कुमार प्रगती सोसायटी, कौसरबाग, कोंढवा खुर्द याठिकाणी एका इमारतीत चौथ्या इसम अडकला असल्याची माहिती मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील जवान घटनास्थळी दाखल झाले.

Advertisements

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहणी करताच समजले की, एक इसम विंग डी या इमारतीत चौथ्या मजल्यावर बाहेरील सज्जावर अडकला आहे. जवानांनी तातडीने अग्निशमन वाहनावरील शिडी सदर इमारतीच्या येथे लावून जवळपास पस्तीस फुट उंचावर जात त्या इसमाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत सेफ्टी बेल्ट, रश्शी याच्या साह्याने सुखरुप खाली घेतले. सदर इसम (वय ३१) हा त्या इमारतीमधील रहिवाशी नसून मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली. तसेच पुढील तपास संबंधित विभागाचे पोलिस करीत आहेत. या कामगिरीत प्रभारी अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे व वाहनचालक सत्यम चौंखडे तसेच तांडेल महादेव मांगडे व जवान सागर दळवी, निलेश वानखडे, कुणाल खाडे, मनोज भारती यांनी सहभाग घेतला.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments