Newsworldmarathi Pune : फुरसुंगी सायंकाळी पाचच्या दरम्यान उरळी देवाची फुरसुंगी येथील कचरा डेपोला आग लागली आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या २५ वर्षातील येथील इतिहास पाहता दरवर्षी उन्हाळ्यात येथील कचरा डेपोला आग लागते. मग यावर्षी आज सायंकाळी पाचच्या सुमारास येथील वेस्टेज पडलेल्या कचऱ्याला आग लागली.
पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी व उरुळी देवाची दोन गावे वगळण्यात आले असून येथे नगरपरिषद करण्यात आली आहे मात्र कचरा डेपोचा परिसर हा पुण्यात पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गतही ठेवण्यात आला आहे तरीही येथील कचरा डेपोवर महापालिकेचे लक्ष नाही. अग्निशामक दलाचे 6 बंबच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
वेस्टेज कचरा येथील प्रकल्पाच्या शेजारी पडला असून तापमान वाढल्याने या कचऱ्याला आग लागली. असे सांगितले जाते आहे. तसे दरवर्षी तापमान वाढल्याने येथील कचरा डेपोला आग लागते. यावर्षीही ही अशीच आग लागली. सायंकाळपर्यंत येथील टँकरने पाणी आणून तेथून फायर गाड्यांनी या कचऱ्याच्या भल्या मोठ्या ढिगाऱ्यावर पाणी फवारून व जेसीबी व पोकलेन च्या साह्याने आग लागलेल्या कचऱ्या हलवून जिथपर्यंत आग पोहोचली आहे तिथपर्यंत पाणी मारण्याचे काम सुरू आहे. तापमान वाढल्यामुळे ही आग लागली असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.


Recent Comments