Homeपुणेमहेश नागरीची दमदार वाटचाल; ठेवी २५० कोटींवर, सभासदांना ९ टक्के लाभांश

महेश नागरीची दमदार वाटचाल; ठेवी २५० कोटींवर, सभासदांना ९ टक्के लाभांश

Newsworldmarayhi Pune : महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने २५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. यावेळी कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मगराज राठी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

Advertisements

संस्थेचे संस्थापक स्व. धनराजजी राठी यांच्या प्रयत्नांतून १९९८ मध्ये महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची सुरुवात झाली. दोन दशकांहून अधिक काळ सभासदांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास ही संस्थेच्या प्रगतीची प्रमुख ताकद असल्याचे मगराज राठी यांनी सांगितले. आर्थिक शिस्त, कर्जवाटप आणि कर्जवसुलीचे नियम काटेकोरपणे पाळत संस्थेने आर्थिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही काम केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सहकार क्षेत्रात संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या ठेवी २३२ कोटी ६९ लाख रुपये, कर्जवाटप १४७ कोटी रुपये आणि एकूण व्यवसाय ३७९ कोटी ६९ लाख रुपये झाला आहे. संस्थेचे भागभांडवल ३ कोटी ५८ लाख रुपये असून निव्वळ नफा २ कोटी १० लाख रुपये झाला आहे. त्यानंतर संस्थेने २५० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण केला.

सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे संस्थापकांचे उद्दिष्ट होते. त्यानुसार घरबांधणी, वाहन खरेदी, देश-विदेशातील शिक्षण तसेच छोट्या व्यावसायिकांना व्यवसायवाढीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यावर संस्थेचा भर राहणार असल्याचे मगराज राठी यांनी सांगितले. सक्षम कर्जवसुली, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार यांचा समतोल राखण्यावरही संस्थेचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सभेला माजी सहकार आयुक्त अनिल कवडे, माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, माजी अपर निबंधक कृष्णाजी वाडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकांचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

२०२६-३१ या कालावधीसाठी निवडून आलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सेवकवर्ग आणि दैनिक ठेव प्रतिनिधींचाही गौरव करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष राजेश राठी यांनी अध्यक्षीय भाषणात सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर केला. सुमारे ५०० सभासद, खातेदार, ठेवीदार आणि हितचिंतकांच्या उपस्थिती सभा पार पडली. उपाध्यक्षा हेमा अनिल बांगड यांनी आभार मानल्यानंतर सभेची सांगता झाली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments