Homeपुणेसंवेदनशील समाजाची आज गरज : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस

संवेदनशील समाजाची आज गरज : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस

Newsworldmarathi Pune : अन्न हे पूर्णब्रह्म असून अन्न तयार करणाऱ्याच्या कामाचा व ते सामाजिक दृष्टीकोनाची जोड देऊन विक्री व्यवसायाच्या कष्टाचा सन्मान होतोय ही आनंदाची बाब आहे. संविधानाला जात धर्म नसतो, तसा अन्नालाही जात धर्म नसतो. अन्नदानाची सात्विक भावना ही मानवतेची आहे. समाजीक बेबनाव, क्रुरता व असुरक्षा रोखण्या करीता सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून ‘नैतीक मुल्याधारीत, संवेदनशील समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे. असे मत अ भा साहीत्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

बल्लवाचार्य कै. म. वा. जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा (२०२४-२५) चा चौथा “अन्नब्रम्ह” पुरस्कार, पुणे शहरातील नामांकित ‘श्री मुरलीधर व्हेज’ अर्थात पूर्वाश्रमीचे मुरलीधर भोजनालयाचे संचालक श्री व सौ शारदा गोपाळदादा तिवारी कुटुंबीय यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे बोलत होते.  सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे हस्ते या पुरस्कारचे वितरण करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हासदादा पवार,  पुरस्काराचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसाद जोशी उपस्थित होते.

डॉ. पराग काळकर म्हणाले, अलीकडच्या तरुण पिढीला अन्न किंवा अन्नदान ही संकल्पनाच कळलेली नाही. ‘टू मिनिट नूडल्स’च्या जमान्यात त्यांना अन्न तयार करण्यामागचे कष्ट कळत नाही. पुण्याच्या विकासात जसे उद्योग क्षेत्राचे महत्त्व आहे तसे शिक्षण क्षेत्राचे पण आहे. पुण्यात दरवर्षी 4 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातील बहुतांशी विद्यार्थी नोकरी निमित्त पुण्यातच राहतात. या काळात भोजनालयाचा खूप मोठा आधार त्यांना असतो.

उल्हासदादा पवार म्हणाले, पिझा – बर्गर सारख्या पाश्चात्य फास्ट फूड खाद्य संस्कृतीच्या वावटळीत, भारतीय खाद्य संस्कृती जपण्याचे काम मुरलीधर भोजनालय व तिवारी कुचुंबिय करत आले आहे जे निरोगी प्रकृती करीता आवश्यक आहे त्यामुळे परदेशी लोकांना पण या खाद्य संस्कृतीने भुरळ घातली आहे. मात्र ज्या प्रमाणे उडपी आपल्या देशाच्या प्रत्येक भागात व्यवसाय करताना दिसतात, तसा मराठी माणूस खाद्य व्यवसाय करताना दिसत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

पुरस्काराला उत्तर देताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, पुर्वाश्रमीच्या मुरलीघर भोजनालयाची ओळख जपण्यासाठी ‘विद्यार्थी मेस’ची संकल्पना मर्यादित संख्येत आज ही राबवीत आहोत. सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेने व्यवसायात नैतिक मुल्यांचे अधिष्ठान ठेवणे गरजेचे असून, ‘नफ्या बरोबर ग्राहकांचा संतोष व समाघान’ कमावणे हे मुरलीघर’ चे प्रथम पासुन वडीलोपार्जित ऊद्दीष्ट ठरले आहे. राज्याच्या विविघ भागातुन अनेक महत्वाचे कलाकार, राजकीय व्यक्ती, उद्येग व्यवसाईक, उच्च पदस्थ यांनी मुरलीघर भोजनालयातील जेवणाचा आस्वाद घेतला आहे. हा पुरस्कार तीन पिढ्यांच्या तपस्येचा, ऊत्तरदायीत्वाच्या सातत्याचा सन्मान आहे. ते म्हणाले, या पुरस्काराचे दुसरे वैशीष्ठ्ये म्हणजे डॉ जोशी सरांनी वडीलांच्या कष्टप्रद आयुष्याचे स्मरण जपत इतर ‘अन्न – व्यवसाईकांना’ सामाजिक जाणीवेची प्रेरणा देण्याचा हेतू साधला आहे. कामगार वर्गा’ प्रती आजवर जपलेला कौटुंबिक व मानवी दृष्टीकोन व त्याची कृतीशील दखल इ मुळे हे शक्य झाल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी यावेळी सांगीतले. तसेच ‘परगांवच्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, दुष्काळजन्य परिस्थितीत व कोरोना काळात सेवा देण्याऱ्या घटकांना’ मुरलीघर भोजनालयातुन, व्यवसाईक दृष्टीकोना पेक्षा सामाजिक दृष्टीकोनातुन’ सेवा दिली गेली याचा अभिमान वाटतो..!

डॉ. न. म. जोशी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, माझे वडील हे आचारी काम करायचे म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी श्राद्ध घालण्यापेक्षा अन्न क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान करण्याचं आम्ही ठरवलं. हीच खरी त्यांना आदरांजली आहे असे मला वाटते. मुरलीधर भोजनालायाची कीर्ती पूर्वी पासून आम्ही ऐकत आलोय.  मुरलीधर च्या भोजनाची वाजवी किंमतीतील सुग्रास चव चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीची आहे.गोपाळदादा तिवारी हे सामाजिक जाणीव असलेले राजकारणी असल्याचे डॅा न म जोशी सरांनी सांगितले.

अन्नब्रम्ह पुरस्कार मानपत्र, सन्मान चिन्ह व रु ५०००/- असे स्वरुप होते.. मात्र रु ५०००/- हे तिवारी कुटुंबीयांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्या करीता डॅा न म जोशी सरां कडे सुपुर्त केले..  मानपत्राचे वाचन दीप्ती डोळे यांनी केले. प्रसाद जोशी यांनी सुत्र संचालन व आभार प्रदर्शन केले. अमर काळे यांच्या ‘गायन कार्यक्रमा’सह मुरलीधर च्या ‘स्नेह भोजना’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

या वेळी सभागृहात घटनातज्ज्ञ प्रा ऊल्हास बापट, मा विठ्ठल मणीयार, रवि चौधरी, सुर्यकांत मारणे, डॉ मोहन ऊचगांवकर, माजी उपप्राचार्य प्रा संजय कंदलगावकर, विष्णु कुलकर्णी, गणेश नलावडे, खाद्यविक्रेता संघाचे मा अध्यक्ष किशोर सरपोतदार, शेखर बर्वे, दत्ता ऊभे, जयंत पवार, दत्त मंदीर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, टिळक गणपती ट्रस्ट अध्यक्ष रविंद्र पठारे, राम विलास तापडीया, राधेश्याम कासट, डॅा तांदळे, राजेद्र खराडे, मेघराज निंबाळकर, अमोल सावंत, किशोर सरदेसाई, प्रा सुरज कुलकर्णी, उमेश चाचर, सुरेश पारखी, मंगेश झोरे, अँड फैयाज शेख, सुभाष जेधे, शेखर बनसोड, सुरेश नांगरे, गोरख पळसकर, बंडू शेडगे, विकास घोले, अण्णा गोसावी, अविनाश गोडबोले, शंकर थोरवे, नितीन पायगुडे, महेश अंबिके, योगेश भोकरे, आशीश गुंजाळ, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, गणेश शिंदे, ॲड स्वप्नील जगताप, सुनील मारणे, महेश हराळे, संजय अभंग, गणेश मोरे, नरेश आवटे, श्रीकांत सांखला बंधू, राजेश सुतार, इ सह  सह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments