पुणे : पुणे पोलिसांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलं आहे. दत्तात्रय गाडे यानं मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. ही धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती. दत्तात्राय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे.
पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचा ताफा, डॉग स्कॉड गुनाट गावात दाखल झालं होतं. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं तयार केली होती. पुणे पोलिसांनी गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे. पोलिसांना आरोपी सापडला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे.


Recent Comments