Newsworldmarathi Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘स्वराज्य सप्ताह’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल तर्फे आयोजित गडकिल्ले स्वच्छता अभियानात तोरणा गडावरील मंदीरांसह, शिवकालीन व ऐतिहासिक महत्व असलेल्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
माननिय अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘स्वराज्य सप्ताह’ राज्यभरात उत्साहात साजरा होतोय. महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांच्या संकल्पनेतून ‘स्वराज्य सप्ताह’ गडकिल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबवून साजरा करण्यात आले. या अभियानाचाच भाग म्हणून तोरणा गडावरील तोरणेश्वर मंदिर, मेंगाई देवीचे मंदिर व महादेव मंदीरात व आवाराची स्वच्छता करून पूजा करण्यात आली.
पर्यटकांकडून गडावर ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या व प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्याप्रमाणात गोळा करण्यात आल्या गडावरील पाण्याच्या टाक्यांच्या भोवतालच्या परिसरातील कचरा गोळा करण्यात आला.
गड किल्ले संवर्धन सेलच्या कार्यकर्त्यांसोबत राजगड तालुका व
आर एम डी कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सेल चे प्रदेश उपाध्यक्ष समीर धुमाळ, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव राजगड तालुका अध्यक्ष वल्लभ कोकाटे, हवेली तालुका उपाध्यक्ष, अमित नागपुरे, मयुरेश पासलकर, राकेश तांबे यांनी संयोजन केले होते.


Recent Comments