Homeपुणेश्री रसिकलाल एम धारिवाल यांचा जन्मदिन रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

श्री रसिकलाल एम धारिवाल यांचा जन्मदिन रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

Newsworldmarathi Pune : आर एम डी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा रसिकलाल एम धारीवाल यांचा जन्मदिन सलग ८ वर्षांपासून रक्तदान शिबिराने साजरा करण्यात येतो . या वर्षी त्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये २०० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी आपले अमूल्य रक्तदान केले . या कार्यक्रमासाठी श्री हरिहरन सुब्रमणी प्रसिद्ध गायक यांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली व शुभेच्छा दिल्या.

श्री रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने फाउंडेशनच्या माध्यमातून “ १०० मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया” एच व्ही देसाई आय हॉस्पिटल येथे पार पडली. यापुढे प्रत्येक महिन्यात १०० मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आर एम डी फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत करण्यात येईल अशी माहिती शोभाताई यांनी दिली.

माढा वेल्फेअर फाउंडेशन निमगाव सोलापूर येथे उभारण्यात येत असलेल्या शोभा धारीवाल मुक्तांगण शेतकरी प्रशिक्षण केंद्राद्वारे” शेतीवर व बिगर शेतीवर आधारित वर्षभर विविध प्रशिक्षण आयोजित केल्या जाणार आहे अशी माहिती संस्थेचे उपस्थित पदाधिकारी यांनी दिली . यावेळी त्यांच्यासह आलेल्या २५ सदस्यांनी रक्तदान केले.

या प्रसंगी कुडची बेळगांव कर्नाटक येथे आर एम डी फाउंडेशन च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या “सौ शोभाताई इंग्रजी माध्यमिक शाळेच्या” पदाधिकाऱ्यांनी व शिक्षक, मुख्याध्यापक यांनी शोभाताईंचे आभार मानले व त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या २० कर्मचाऱ्यांनी यावेळी रक्तदान केले
पुणे रिंग रोड प्रकल्पातील कापल्या जाणाऱ्या शेकडो वृक्षांना “ट्री ट्रान्सप्लान्टेशन ” च्या माध्यमातून वाचविण्याचे कार्य फाऊंडेशन द्वारा सुरु केलेले आहे अशी माहिती जान्हवी धारीवाल बालन यांनी दिली व या उपक्रमासाठी समाजातील प्रत्येकाने यथायोग्य सहकार्य करून वृक्षवाचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी केले.

त्याच प्रमाणे वृद्धेश्वर सिद्धेश्वर या प्राचीन मंदिराचे जीर्णोध्दार केल्या बद्दल मंदिराच्या वतीने शोभाताईंचे आभार मानण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी आठ वाजता सुरू झालेले रक्तदान शिबिर सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments