Homeमुंबईतानाजी सावंत वेटिंगवर, फडणवीस यांनी दार लावले...

तानाजी सावंत वेटिंगवर, फडणवीस यांनी दार लावले…

Newsworldmarathi Mumbai : शिवसेनेचे नेते तथा राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले. पण देवेंद्र फडणवीस हे भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत असल्याने तानाजी सावंत त्यांची भेट घेऊ शकले नाही.

तानाजी सावंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर तानाजी सावंत हे ताटकरळ उभे होते. ते बंगल्याबाहेर उभे असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. तानाजी सावंत हे फडणवीसांच्या भेटीसाठी बंगल्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी याची वाट पाहताना दिसत आहेत. तानाजी सावंत जवळपास तीन ते पाच मिनिटे बंगल्याबाहेर वाट पाहत उभे होते.

यानंतर सुरक्षा रक्षकांनी बंगल्याचं गेट उघडलं. यानंतर ते बंगल्यात गेले. पण तरीही त्यांची फडणवीसांसोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात तानाजी सावंत यांना फडणवीसांची भेट न घेताच परतावं लागलं.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments