Newsworldmarathi Pune : पुण्यातील स्वारगटे बस स्थानकात एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे बाबत दिवसागणिक नवीन माहिती समोर येत आहे. नराधम गाडे स्वारगेट एसटी स्टँडवर महिला सावज हेरायचा अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरम्यान, आता नवी माहिती हाती लागली आहे. दत्तात्रय गाडे याचा पोलिसी गणवेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस असल्याचे सांगून अनेक तरुणींना फसवायचा असे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता गाडे याला गेल्यावर्षी स्वारगेट पोलीसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेव्हा त्याच्या मोबाईलमधे आढळलेला हा फोटो आहे. आपण पोलीस आहे अशी बतावणी करुन पोलीस दलात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करु शकतो, असे सांगत अनेक तरुणींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा.
गाडे सातत्याने स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात फिरायचा. कधी पोलीस अधिकारी, कधी बस कंडक्टर असल्याचे भासवून त्यांनी अनेकांना लुटल्याची माहितीही समोर आली आहे.


Recent Comments