Homeपुणेपूजा खेडकरला विभागीय आयुक्तालयाची कारणे दाखवा नोटीस..

पूजा खेडकरला विभागीय आयुक्तालयाची कारणे दाखवा नोटीस..

Newsworldmarathi Pune : भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस भा बोर्डतर्फ प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने पाठवली आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) बडतर्फ प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने पाठवली आहे. इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभघेण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी उमेदवाराच्या पालकांचे उत्पन्न वार्षिक आठ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे, ही अट आहे.

पूजाने अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या तत्कालीन प्रांताधिका-यांकडून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवले होते. पूजाचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त शासकीय अधिकारी आहेत. अलीकडेच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ४० कोटींची मालमत्ता जाहीर केली होती. पुजा खेडकर यानी युपीएससीला सादर केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विवरण पत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात म्हाळुंगे ५.८१,५.९० गुंठे आणि कोंढवा ७२४ स्क्वेअर फूट जमीन, तर धडवली येथे ४.७४ हेक्टर जमीन, तर नगर जिल्ह्यातील नांदूर मध्ये २.८९ हेक्टर, पाचुंदे ०.८१ हेक्टर, सारेडीत ९८४ स्क्वेअर फूट मोकळी जागा मालकीची आहे.

पूजा खेडकरने ओबीसी प्रवर्गातून ही परीक्षा दिली होती. यात नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक होते. ते जोडले, पण वडील दिलीप खेडकर माजी सनदी अधिकारी आहेत. त्यांना मिळणारी पेन्शनसुद्धा लाखोंच्या घरात असते. वडिल दिलीप खेडकर यांनी २०२४ मध्ये अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ४० कोटींची संपत्ती जाहीर केली होती. तसेच आई मनोरमा खेडकर यांनीदेखील अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आई मनोरमा यांची संपत्ती १५ कोटी तर वडिलांची ४० कोटीची संपत्ती असताना पुजा खेडकरला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले असा सवाल उपस्थित झाले होते.

पूजाच्या प्रमाणपत्रावर विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याची पडताळणी प्रगतीपथावर असून त्या अंतर्गत है प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशी नोटीस खेडकरला बजावण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments