Homeपुणेपुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना; वडिलांनीच केला साडे तीन वर्षाच्या चिमुकल्याचा खून..

पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना; वडिलांनीच केला साडे तीन वर्षाच्या चिमुकल्याचा खून..

Newsworldmarathi Pune : पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन आय टी इंजिनियर बापाने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा गळा कापून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Pune News)

हिम्मत माधव टीकेटी (वय साडे तीन वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीकेटी कुटुंब मूळचे विशाखापट्टणम चे आहेत. माधव याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता. काल दुपारी पती पत्नीत भांडणे झाली. (Pune Crime)

पती मुलाला घेऊन घराबाहेर गेला. एका बार मध्ये दुपारी बसला. तेथून साडे बारा वाजता बाहेर पडला. तेथून सुपर मार्केट मध्ये गेला. त्यानंतर चंदननगर येथील जंगलात गेला. रात्री त्याची पत्नी चंदननगर पोलिस ठाण्यात आली. पति आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी सीसी टीव्ही तपासून त्यांचा माग काढला. पहाटे तो चंदननगर जवळील जंगलात दारूच्या नशेत सापडला. त्याला मुलगा कोठे आहे विचारल्यावर त्याने मारून टाकले असे सांगितले. पोलिसांनी जंगलात शोध घेतल्यावर तेथे मुलाचा गळा कापल्याचे दिसून आले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments