Newsworldmarathi Pune: ग्रामीण जिल्ह्यात कोणतीही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणारे व्यावसायिक यांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी त्याची पूर्वमाहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून, प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत
जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था आहेत. त्यामुळे अशा ठिकाणांची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन, त्या माहितीचा अतिरेकी कारवायांमध्ये वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरूर या तालुक्यांच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.
अशा घटनांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफियादेखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चोऱ्यांसाठीही ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. हे आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील


Recent Comments