Newsworldmarathi Pune : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यानंतर आज राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं चित्र आहे.
त्याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाल्याची माहिती आहे. वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटमध्ये आज बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र शरद पवार बैठकीला दाखल होण्याआधीच जयंत पाटील आणि अजित पवार या दोघामध्ये बंद केबिनमध्ये चर्चा सुरू आहे. आजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार हे व्हीएसआयच्या नियामक मंडळात आहेत.
राजकीय वर्तुळात एकीकडे जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत, तर दुसरीकडे वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी आलेले असताना जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये केबिनमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये आज बैठक होणार आहे, यासाठी हे नेते एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही चर्चा झाली असल्याची माहिती आहे.


Recent Comments