Homeपुणेरुपाली चाकणकर यांनी घेतली भिसे कुटुंबाची भेट..

रुपाली चाकणकर यांनी घेतली भिसे कुटुंबाची भेट..

Newsworldmarathi Pune : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी आज महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी सविस्तर प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

चाकणकर म्हणाल्या, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची घटना घडली त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहेत. आरोग्य सुविधा ही मूलभूत अशी गरज आहे नागरिकांना धर्मादाय संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देण अपेक्षित असताना आणि तशी नियमावली असताना रुग्णाला त्यांनी उपचार देण्यासाठी टाळाटाळ केली. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.

रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेली चर्चा ही गोपनीय असते पण रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी अहवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. आणि त्यामध्ये रुग्णच्या बऱ्याचश्या गोपनीय गोष्टी जाहीर केले आहे. हे अत्यंत चुकीचा आहे हा अहवाल रुग्णालयाने समिती समोर मांडायला पाहिजे होता. याबद्दल त्यांना कडक शब्दात समज देणार आहे. असे ही रुपाली चकणकर म्हणाल्या.

आज राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस आयुक्तालयांमध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये राज्याच्या वतीने जी समिती केली आहे त्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयात सादर केला जाणार आहे. शिवाय पोलिसांनी जो जबाब नोंदवलं आहे त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याचे चाकणकर म्हणाल्या.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments