Homeक्राईमसंभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Newsworldmarathi Pune : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाला कडकडून चावा घेतला. यानंतर संभाजी भिडे यांना तातडीने सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या धारकऱ्यांसमवेत विविध ठिकाणी फिरतीवर असतात. सोमवारी रात्री भिडे गुरूजी सांगलीमध्ये होते. सांगलीच्या माळी गल्ली परिसरात एका धारकऱ्याच्या घरी ते जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून व इतर चर्चा संपवून ते रात्री ११ वाजताच्या सुमारास घराकडे निघाले. त्याच वेळी एका कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या पायाचा चावा घेतला. यावेळी त्यांना काही अंशी दुखापत झाली. त्यांना लगेचच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केले होते. “संभाजीराजे भोसले बोलतात ते १०० टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचले आहे आणि ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे” असे म्हणत भिडे गुरूजींनी स्मारकाला समर्थन दर्शवले होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments