Homeक्राईमहृदयद्रावक...! डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू; नाका- तोंडातून रक्तस्राव...

हृदयद्रावक…! डीजेच्या आवाजाने तरुणाचा मृत्यू; नाका- तोंडातून रक्तस्राव…

Newsworldmarathi Nashik : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत डीजेच्या आवाजाने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना नाशिक शहरातील पेठ रोडवरील फुलेनगर भागात घडली आहे. नितीन फकिरा रणशिंगे (वय-२३) असे मृत युवकाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येस रविवारी पेठरोड भागात निघालेल्या मिरवणुकीत रणशिंगे सहभागी झाला होता. फुलेनगर येथील तीन पुतळ्याजवळ सायंकाळी ७.३० च्या सुमारास डीजेचा दणदणाट सुरू असताना हा प्रकार घडला. डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्यामुळे अचानक नितीनच्या तोंडातून, नाकातून रक्तस्राव सुरू झाला.

ही बाब निदर्शनास येताच भाऊ आनंदा रणशिंगे यांनी त्यास तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फुप्फुसाच्या क्षयरोगाने पीडित असल्याने नितीनवर चार वर्षांपासून उपचार सुरू होते. तो न्यूमोनिया या आजारावरही उपचार घेत होता. त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments