Homeक्राईमआजी-आजोबांचा चिकू गेला... माजी आमदाराच्या नातवाच निधन

आजी-आजोबांचा चिकू गेला… माजी आमदाराच्या नातवाच निधन

पुणे : शिरुर तालुक्याचे माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांच्या नातवाचे अकस्मात निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ऐन तारुण्यातील शर्विन यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मूळ गावी मुंबईत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान, शर्विन यांचा दशक्रिया विधी शनिवारी मुंबई येथे होणार आहे.

शिरूर तालुक्यातील पलांडे कुटुंब हे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या परिचित आहे.. सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे हे शिरूर तालुक्याचे माजी आमदार होते, ज्यांनी या भागात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांचे सुपुत्र संजीव पलांडे सध्या कोकण भवन येथे उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. शर्विन ऊर्फ चिकू (वय २०) यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. ते कोकण भवन येथील उपायुक्त संजीव पलांडे यांचे सुपुत्र होते.

सोमवारी मुंबई येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कुटुंबातील तरुण पिढी, शर्विन ऊर्फ चिकू, यांच्याकडूनही भविष्यात सामाजिक कार्याची अपेक्षा होती, परंतु त्यांच्या अकस्मिक निधनामुळे कुटुंबाला परिसराला मोठा धक्का बसला आहे.

शर्विन यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार होते. सध्या ते वकिलीचे शिक्षण घेत होते. रविवारी मुंबईत त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, एक बहीण, आजी, आजोबा, आत्या, मामा असा परिवार आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments